IND vs NED | श्रेयस अय्यर याचं नेदरलँड्स विरुद्ध जबरदस्त शतक
Shreyas Iyer Century | मुंबईकर श्रेयस अय्यर याने बंगळुरुतील एन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नेदरलँड्स विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय.
बंगळुरु | टीम इंडियाचा युवा फलंदाज मुंबईकर श्रेयस अय्यर याने नेदरलँड्स विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. श्रेयसचं हे पहिल्याच वर्ल्ड कपमधील पहिलंवहिलं शतक ठरलंय. तसेच श्रेयसच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. श्रेयसने 84 चेंडूच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. श्रेयसला या वर्ल्ड कपमध्ये 2 वेळा शतक करण्याची संधी होती. मात्र श्रेयसची शतकाची संधी हुकली. मात्र श्रेयसने नेदरलँड्स विरुद्ध यशस्वीपणे शतक ठोकलंय.
श्रेयसने 84 बॉलमध्ये 9 चौकार-2 सिक्सच्या मदतीने आणि 119.05 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. श्रेयसने शतक ठोकल्यानंतर टॉप गिअर टाकत आक्रमक फलंदाजी केली. श्रेयसने नाबाद 94 बॉलमध्ये नाबाद 128 धावांची खेळी केली. श्रेयसने या खेळीदरम्यान 136.17 च्या स्ट्राईक रेटने 5 सिक्स आणि 11 चौकार फटकावले.
2 हुकलं तिसऱ्यांदा ठोकलं
श्रेयसने याआधीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध 87 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली. तर श्रीलंका विरुद्ध श्रेयसने 56 बॉलमध्ये 82 रन्स केल्या होत्या. श्रेयसने या दोन्ही सामन्यांमध्ये वादळी आणि स्फोटक खेळी केली होती. श्रेयसने ज्या पद्धतीने ही खेळी केली, त्या हिशोबाने तो शतक पूर्ण करणार, असं वाटत होतं. मात्र श्रेयसने शतकाची पर्वा न करता टीमसाठी शतकाची आहुती दिली. श्रेयसला दोनवेळा जवळ येऊनही शतक करता आलं नाही. मात्र श्रेयसने नेदरलँड्स विरुद्ध शतक करुन सर्व हिशोब बरोबर केला.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रेयसचं वेगवान शतक
𝘾𝙀𝙉𝙏𝙐𝙍𝙔 for Shreyas Iyer in Bengaluru! 💯
A memorable maiden World Cup HUNDRED for him 👏👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/D2sYE1Xjr4
— BCCI (@BCCI) November 12, 2023
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.