Shubman Gill अफगाणिस्तानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर! वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता
Shubman Gill Health Update | टीम इंडियाचा मॅचविनर बॅट्समन शुबमन गिल याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शुबमन गिल पाकिस्तान विरुद्धही खेळणार नसल्याचं समोर आलं आहे.
चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र टीम इंडियाला या स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठा झटका लागला. टीम इंडियाचा स्टार ओपनर शुबमन गिल हा आजरपणामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी टीममध्ये ईशान किशन याला संधी देण्यात आली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली. मात्र शुबमन गिलची उणीव टीम इंडियाला निश्चित भासली.
शुबमन गिल याला डेंग्युची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे तो अफगाणिस्तान विरुद्धही खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने 9 ऑक्टोबर रोजी ट्विटद्वारे दिली. त्यानंतर मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी सकाळी शुबमन गिल याला प्रकृती खालवल्याने रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर काही तासांनी आता शुबमन गिल याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुबमन गिल याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता शुबमन गिलला आजारपणामुळे पाकिस्तान विरुद्ध खेळता येणार नसल्याचं निश्चित झालंय.
गिलला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला. त्यानंतर गिलची प्लेटलेटची संख्या ही 1 लाखांपेक्षा कमी झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून शुबमनला रविवारी रात्री हॉस्टिपलमध्ये एडमिट करण्यात आले. त्यानंतर शुबमनवर आवश्यक ते उपचार करण्यात आले. शुबमनची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र तरीही त्याच्यावर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक हे लक्ष ठेवून असणार आहे.
शुबमनला डिस्चार्ज
STORY | Shubman Gill discharged from hospital but likely to miss match against Pakistan
READ: https://t.co/o9FAPDOEjo
(PTI Photo) #ICCWorldCup2023 pic.twitter.com/OEg2ERg9pI
— Press Trust of India (@PTI_News) October 10, 2023
टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना खेळणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात 14 ऑक्टोबरला पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. आता शुबमन अफगाणिस्ताननंतर पाकिस्तान विरुद्धही खेळणार नाहीये. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन प्रचंड वाढलंय.
आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.