IND vs NZ | शतकासाठी 21 धावांची गरज असताना गिलला रोहिने घेतलं बोलावून, नेमकं काय कारण?
Shubman Gill Retire Hurt : भारत आणि न्यूझीलंडच्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 398 धावा केल्या. या इनिंगमध्ये रोहितने शुबमनला माघारी बोलावलं होतं. नेमकं काय झालं होतं जाणून घ्या.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंडमध्ये सूरू असलेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने टॉस जिंकला असूनन प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यामध्ये परत एकदा रोहितने दिवाळीचे फटाके फोडल्यासारखे चौकार-षटकार मारले. भारत आता मजबूत स्थितीत आहे मात्र मैदानात असं काही घडलं की 79 धावांवर खेळत असलेल्या गिलला माघारी बोलावलं.
पाहा व्हिडीओ-
Clips of Shubham Gill when he get retired hurt
Jay shah #SachinTendulkar BCCI #MenInBlue #IndiaVsNewZealand #indvsnz #RohitSharma #ViratKohli rohit sharma Kane Williamson Dhoni #IndianCricketTeam cramps selfless #hitman #WorldCup2023 #ShubhmanGill #gillpic.twitter.com/JV1VNwFfcU
— 101™ REPORTS (@viratkohali1231) November 15, 2023
23 व्या ओव्हरमध्ये शुबमन गिल 79 धावांवर माघारी परतला आहे. त्याच्या जागी मैदाना श्रेयस अय्यर उतरला होता. शुबमन गेल्यावर आलेल्या अय्यरनेही कडक फलंदाजी करत धावगतीला बुस्टर दिला. रोहित असताना गडी एकदम स्लो खेळत होता. मात्र जसा रोहित गेला त्यानंतर गिलने कोहली सेट होईपर्यंत धुलाई सुरू केली. गिलचं हे वर्ल्ड कपमधील चौथं अर्धशतक आहे. 40 बॉलमध्ये त्याने आपलं अर्धशतक केलं मात्र तो 79 धावांवर खेळत असताना पायाला क्रॅम्प आला. सूर्या बाद झाल्यावर तो आला आणि एक धाव करून नाबाद राहिला.
शुबमन धावा काढताना त्याला अडचण येत असल्याचं रोहितच्या लक्षात येताच त्याला रिटायर हर्ट केलं. शुबमनसुद्धा जाताना लंगडत गेला. फिल्डिंगलाही तो काही मैदानावर आला नाही. त्याच्या जागी इशान किशान याला घेण्यात आलं होतं.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज