Shubman Gill : 5 महिन्यात विराटचा रेकॉर्ड मोडला, शुभमन गिल याच्या शानदार सेंच्युरीच्या 7 मोठ्या गोष्टी
Shubman Gill : न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात गिल अपयशी ठरला. पण तिसऱ्या सामन्यात किवी बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. त्याला चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकायचा असा प्रश्न न्यूझीलंडच्या बॉलर्सना पडला होता.
IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. काल त्याने न्यूझीलंडच्या बॉलर्सना अक्षरक्ष: कुटून काढलं. शुभमनने काल शानदार सेंच्युरी झळकवली. प्रत्येक सामन्यानिशी शुभमन गिल आपल्या खेळाने एक नवी उंची गाठतोय. न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये दोन शतकं झळकवणाऱ्या शुभमनने काल T20 मध्येही तोच कित्ता गिरवला. आता अवघ्या 23 वर्षांचा असलेल्या शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात गिल अपयशी ठरला. पण तिसऱ्या सामन्यात किवी बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. त्याला चेंडू कुठल्या टप्प्यावर टाकायचा असा प्रश्न न्यूझीलंडच्या बॉलर्सना पडला होता. इतकी जबरदस्त बॅटिंग शुभमन गिलने केली. शुभमन गिलने शतक झळकवताना विराट कोहलीचा रेकॉर्ड 5 महिन्यात मोडला.
- शुभमन गिल तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा भारताचा पाचवा बॅट्समन आहे. त्याच्याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीने अशी कामगिरी केलीय.
- गिलने फक्त 63 चेंडूत 126 धावा चोपल्या. T20 मध्ये भारतासाठी हा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. गिलच्या आधी विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची शतकी खेळी केली होती. 8 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध विराटने ही कामगिरी केली होती. शुभमनने 5 महिन्यात हा रेकॉर्ड मोडला.
- शुभमन गिल T20 इंटरनॅशनलध्ये शतक झळकवणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज आहे. गिलने 23 वर्ष 146 दिवस वय असताना, ही कामगिरी केलीय. त्याने सुरेश रैनाला मागे टाकलं. रैनाने 23 वर्ष 156 दिवस वय असताना T20 मध्ये शतक झळकावलं होतं.
- गिल न्यूझीलंड विरुद्ध या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्कोर करणारा फलंदाज बनलाय. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेवीचा (नाबाद 117) धावांचा रेकॉर्ड मोडला. गिलने मागच्या महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये डबल सेंच्युरी झळकवली होती.
- गिलच टी 20 इंटरनॅशनलमधील हे पहिलं शतक आहे. या फॉर्मेटमध्ये सेंच्युरी झळकवणारा तो भारताचा सातवा फलंदाज आहे. त्याच्याआधी सुरेश रैाना, रोहित शर्मा, केएल राहुल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने शतकी खेळी केलीय.
- इतकच नाही, टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मध्ये मोठी धावसंख्या उभारली. याआधी टीम इंडियाने 2019 साली हॅमिल्टनमध्ये 208 धावा केल्या होत्या.
- गिलने 14 डिसेंबर 2022 पासून सर्व तिन्ही फॉर्मेटमध्ये 5 शतकं झळकवली आहेत. या कालावधीत कुठल्याही फलंदाजाने झळकवलेली ही सर्वाधिक शतकं आहेत.