Shweta Sehrawat: ऋषभ पंतच्या ‘गुरुकुल’मध्ये पाहिलं स्वप्न, त्यानंतर एका पत्राने बदललं आयुष्य
ते पत्र श्वेताला मिळालं नसतं, तर टीम इंडिया आज या टॅलेंटेड खेळाडूपासून वंचित राहिली असती. श्वेता सेहरावतच्या यशाचा प्रवास ऋषभ पंतच्या गुरुकुलपासून सुरु झाला.
U-19 WC Final : भारताच्या मुलींनी जग जिंकलय. 29 जानेवारीच्या रात्री त्यांनी इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेत पहिली महिला अंडर-19 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा झाली. टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवला. या वर्ल्ड कप विजयात सर्वच खेळाडूंच योगदान आहे. पण श्वेता सेहरावत या विजयाची खरी नायिका आहे. श्वेताने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 297 धावा फटकावल्या. श्वेताची सरासरी 99 होती. तिचा स्ट्राइक रेट 140 च्या जवळ होता. श्वेताना सर्वाधिक 3 अर्धशतकं झळकावली.
अन्यथा टीम इंडियाला ‘ही’ टॅलेंटेड खेळाडू गवसली नसती
फायनलमध्ये श्वेताने फक्त 5 रन्स केल्या. पण टीमला फायनलपर्यंत पोहोचवण्यात तिचं महत्त्वाच योगदान होतं. श्वेताच्या बाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे, ती या वर्ल्ड कपमध्ये फक्त एका पत्रामुळे खेळू शकली. ते पत्र श्वेताला मिळालं नसतं, तर टीम इंडिया आज या टॅलेंटेड खेळाडूपासून वंचित राहिली असती. श्वेता सेहरावतच्या यशाचा प्रवास ऋषभ पंतच्या गुरुकुलपासून सुरु झाला.
सोनेट क्लबमध्ये पाहिलं क्रिकेटच स्वप्न
श्वेता 8 वर्षांची होती, तेव्हाच तिने क्रिकेट खेळण्याचा निर्धार पक्का केला. मोठी बहीण स्वातीला पाहून श्वेतामध्ये क्रिकेट खेळण्याची जिद्द निर्माण झाली. श्वेताची मोठी बहीण स्वाती सोनेट क्लबमध्ये प्रॅक्टिससाठी जायची. श्वेता सुद्धा वडिलांसोबत सोनेट क्लबमध्ये जायची. क्लबमध्ये क्रिकेट पाहून तिने क्रिकेटर बनण्याच मनापाशी ठरवलं. हा सोनेट क्लब दिल्लीमध्ये प्रसिद्ध आहे. याच क्लबने ऋषभ पंतसारखा टॅलेंटेड खेळाडू टीम इंडियाला दिला. श्वेताना या अकादमीत नाही, तर वसंत कुंज क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले. त्यानंतर श्वेताने कधी मागेवळून पाहिलं नाही.
पत्राने बदललं आयुष्य
मागच्यावर्षी मे महिन्यात श्वेताने अंडर-19 वर्ल्ड कप खेळायचा नाही, हे ठरवलं होतं. तिची 12 वी ची परीक्षा जवळ येत होती. तिने एनसीए चीफ आणि माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांना पत्र लिहून ही गोष्ट सांगितली. हे पत्र वाचल्यानंतर लक्ष्मण फार खूश झाले नाहीत. त्यांनी तात्काळ श्वेताला काही दिवस कॅम्पमध्ये येऊन राहण्यास सांगितलं. लक्ष्मण यांच ते पत्र श्वेताला मिळालं. लक्ष्मण यांचा संदेश
तिने एनसीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 3 जूनला श्वेता कॅम्पमध्ये पोहोचली. 2 मॅचमध्ये ती खेळली. एक शतक तिने झळकवलं. त्यानंतर पुढच्या 6 सामन्यात तिने आणखी दोन सेंच्युरी झळकवल्या. या प्रदर्शनानंतर श्वेतामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. तिला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालं. त्यानंतर श्वेताची स्फोटक बॅटिंग सगळ्यांनीच पाहिली.