Shoaib Akhtar च्या आयुष्यावर येणार चित्रपट, जाणून घ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका कोण बजावणार?
Shoaib Akhtar: चित्रपटाच शूटिंग कुठे होणार? आणि कधी रिलीज होणार चित्रपट?
लाहोर: भारतानंतर आता पाकिस्तानात खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक बनवण्याचा सिलसिला सुरु झाला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या आयुष्यावर चित्रपट येतोय. हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होईल. या चित्रपटात शोएब अख्तरची भूमिका गायक आणि अभिनेता उमेर जसवाल साकारणार आहे.
पोस्टर रिलीज
उमेरने बुधवारी चित्रपटाचा पोस्टर रिलीज करुन याची माहिती दिली. पोस्टमध्ये त्याने शोएबची 14 नंबरची जर्सी घातली आहे. या चित्रपटात शोएब अख्तरची भूमिका साकारणार असल्याच त्याने सांगितलं. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ चित्रपटाच नाव आहे. शोएब अख्तर मैदानावर याच नावाने ओळखला जायचा.
चित्रपटात किती वर्षाचा काळ दाखवणार
या चित्रपटात शोएबच्या जन्मापासून ते 2002 पर्यंतचा त्याचा प्रवास दाखवला गेलाय. वेगवेगळ्या वयात शोएब सारख दिसण्यासाठी उमेर स्वत:ला तयार करतोय. तो क्रिकेटची ट्रेनिंग सुद्धा घेतोय. पडद्यावर लोकांना हा खराखुरा शोएब अख्तर आहे, असं भासवण्यासाठी तो आपल्यापरीने सगळी मेहनत घेतोय.
कुठे होणार शूटिंग?
डिसेंबरमध्ये या चित्रपटात शूटिंग सुरु होणार आहे. पाकिस्तान, दुबई, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात चित्रीकरण होईल. उमेर ही खूप साकारण्यासाठी खूपच उत्साहित आहे. “शोएबच आयुष्य एक प्रेरणा आहे. तो फक्त पाकिस्तानच नाही, जगातील एक मोठा स्टार आहे” असं उमेर जसवाल म्हणाला.
View this post on Instagram
कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
हा चित्रपट पुढच्यावर्षी 16 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता समालोचक म्हणून तो काम करतो. क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर आहे. आपल्या करियरमध्ये त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना दुखापती दिल्या आहेत.