KK Passes Away: ‘आयुष्य किती अनिश्चित आहे’, KK यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटपटूही हळहळले
KK Passes Away: भारतीय क्रिकेटपटूंमध्ये केके यांची एक वेगळी फॉलोइंग होती. भारताचे प्रसिद्ध लेग ब्रेक गोलंदाज अनिल कुंबळे यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मुंबई: सुप्रसिद्ध गायक केके यांचं काल रात्री कोलकाता येथे निधन झालं. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटत होतं. ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने केके यांचा मृत्यू (KK death) झाला. त्यांच्या निधनाने फक्त संगीत विश्वावरच नव्हे, क्रीडा विश्वावरही शोककळा पसरली आहे. आपल्या जादुई आवाजाने केके यांनी रसिक प्रेक्षकांच्या ह्दयावर राज्य केलं. क्रिकेट विश्वही (Indian Circket) याला अपवाद नाही. केके यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटूही शोकसागरात बुडाले आहेत. त्यांनी आपआपल्या पद्धतीने केके यांना श्रद्धांजली वाहिली. अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, (Virender Sehwag) युवराज सिंग, वीवी एस लक्ष्मण आणि सुनील जोशी असे दिग्गज क्रिकेपटू केकेच्या गाण्यांचे चाहते होते. केकेच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांनी टि्वट करुन श्रद्धांजली वाहिली. केके 53 वर्षांचे होते. लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांची गाणी थेट ह्दयाला भिडायची
केके यांनी 90 च्या दशकात अनेक गाजलेली गाणी गायली. त्यांची गाणी थेट ह्दयाला भिडायची. त्यांच्या आवाजात एक जादू होती. त्यामुळेच सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळ स्थान होतं. काल रात्री त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेक जण हळहळले. केके यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. भारतीय क्रिकेटपटूंनाही त्यांनी आपल्या सूरांनी मोहित केलं होतं. अनेक क्रिकेटपटूंबरोबर केके यांची चांगली मैत्री होती.
Deeply saddened by the passing of KK. Condolences to his family and friends. ??
— Anil Kumble (@anilkumble1074) June 1, 2022
भारतीय क्रिकेटपटूंनी काय म्हटलय?
भारतीय क्रिकेटपटूंमध्ये केके यांची एक वेगळी फॉलोइंग होती. भारताचे प्रसिद्ध लेग ब्रेक गोलंदाज अनिल कुंबळे यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे, असे अनिल कुंबळे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Tragic to hear about the passing away of KK after falling ill while performing in Kolkata. Another reminder of how fragile life is. Condolences to his family and friends. Om Shanti. pic.twitter.com/43B3dzykP3
— Virender Sehwag (@virendersehwag) May 31, 2022
Life is so uncertain and fragile! Sad news about the tragic passing away of KK. May god grant strength to his family to bear with this loss. Om Shanti ??
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 31, 2022
केके यांचं निधन हे मोठं नुकसान असल्याचे वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. केके यांच्या निधनामुळे आयुष्य किती अनिश्चित आहे, हे दिसून आलं. माझी संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहे. ओम शांती, असं सेहवागने म्हटलं आहे.