SLvsEng 2nd Test | भारत दौऱ्याआधी इंग्लंडची धमाकेदार कामगिरी, श्रीलंकेवर 2-0 ने एकतर्फी विजय
भारत दौऱ्याआधी श्रीलंकेमध्ये 2-0 च्या फरकाने कसोटी मालिका जिंकण ही इंग्लंडसाठी प्रोत्साहन देणारी बाब आहे.
कोलंबो : पाहुण्या इंग्लंड क्रिकेट टीमने (Team England) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेवर (Sri Lanka) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने 2-0 अशा एकतर्फी फरकाने ही कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला दुसऱ्या डावात अवघ्या 126 धावांवर ऑल आऊट केलं. श्रीलंकेकडे 37 धावांची आघाडी होती. यामुळे इंग्लंडला विजयासाठी 164 धावांचे माफक आव्हान मिळाले. इंग्लंडने हे विजयी आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंडकडून डॉमनिक सिबलेने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर जॉस बटलरने नाबाद 46 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (sl vs eng 2nd test england beat sri lanka by 6 wickets and win series by 2-0)
England win ?
They defeat Sri Lanka by six wickets to take the Test series 2-0 ?
This is their sixth consecutive Test victory in Sri Lanka!#SLvENG ➡️ https://t.co/3ZC7G8CMYp pic.twitter.com/jiOAK9rZqS
— ICC (@ICC) January 25, 2021
श्रीलंकेचा दुसरा डाव
इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला दुसऱ्या डावात अवघ्या 126 धावांवर ऑल आऊट केलं. दुसऱ्या डावात लंकेकडून एम्बुल्डेनियाने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. इंग्लंडकडून डोम बेस आणि जॅक लिच या जोडीने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार जो रुटने 2 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचा पहिला डाव
लंकेने पहिल्या डावात 381 धावा केल्या. तसेच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 344 धावांवर रोखले. यामुळे श्रीलंकेला दुसऱ्या डावात 37 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 186 धावांची खेळी केली. जोस बटलरने 55 धावांची खेळी केली. पहिल्या डावात लसिथ एम्बुल्डेनिया सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेचा पहिला डाव
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूसने 110 धावांची शतकी खेळी केली. तर निरोशन डिकवेलाने 92 धावा केल्या. दिलरूवान परेराने 67 धावा केल्या. तर कर्णधार दिनेश चांदिमालने 52 धावा केल्या. यासह श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद 381 धावा केल्या.
भारत दौरा
दरम्यान श्रीलंकेला त्यांच्याच घरात 2-0 ने पराभूत केल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या भारत दौऱ्यात इंग्लंड कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या :
Sri Lanka vs England, 2nd Test | जो रुटची विक्रमाला गवसणी, 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
Ind vs Eng 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे स्टार खेळाडू भारतात दाखल
England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?
(sl vs eng 2nd test england beat sri lanka by 6 wickets and win series by 2-0)