SL vs IND: टीम इंडियात बदल निश्चित! कॅप्टन रोहितकडून या खेळाडूंना डच्चू फिक्स! कशी असेल प्लेइंग ईलेव्हन?
Sri Lanka vs Team India 2nd Odi: टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 231 धावा करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात बदल होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 230वर आटोपला. रोहित शर्मा याच्या 56 धावांच्या खेळीनंतरही भारताला 231 धावांचं आव्हान पूर्ण करता आलं नाही. श्रीलंकेने गमावलेला सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. त्यामुळे 3 सामन्यांची मालिका पहिल्या मॅचनंतर 0-0 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी सलामीच्या सामन्यात निराशा केली. त्यामुळे कॅप्टन रोहित दुसर्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकतो.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा रविवारी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात तर 2 वाजता टॉस होणार आहे. सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. पहिल्या सामन्यात कॅप्टन रोहित-हेड कोच गौतम गंभीर यांनी केलेला एक प्रयोग फसला. वॉशिंग्टन सुंदर याला बॅटिंगसाठी वरच्या स्थानी पाठवलं. मात्र वॉशिंग्टन अपयशी ठरला. तर दुसऱ्या सामन्यासाठी ऋषभ पंत याला संधी मिळणार की नाही? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे 2 बदल होण्याची शक्यता आहे. रोहित वॉशिंग्टनच्या जागी रियान पराग याला संधी देऊ शकतो. रियानला संधी मिळाल्यास त्याचं एकदिवसीय पदार्पण ठरेल.
तसेच दुसऱ्या बाजूला कॅप्टन रोहित कोणत्याही बदलाशिवायही दुसऱ्या सामन्यात उतरु शकतो. त्यामुळे आता हिटमॅन त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवणार की डच्चू देणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश तीक्षना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.