SL vs IND 3rd Odi Toss: तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेच्या बाजूने टॉस, बॅटिंग कुणाची?
Sri Lanka vs India 3rd Odi Toss: श्रीलंका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी हा 'करो या मरो' असा सामना आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. श्रीलंका या मालिकेत 2 सामन्यांनंतर 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी तिसरा आणि अंतिम सामना हा करो या मरो असा आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. तर चरिथ असलांकाकडे श्रीलंकेची धुरा आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन चरिथने बॅटिंगचा निर्णय घेत भारताला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे.
टीम इंडियात 2 बदल
कॅप्टन रोहित शर्मा याने या ‘करो या मरो’ सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. केएल राहुल आणि अर्शदीप सिंह या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. तर त्याच्या जागी विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत याचा समावेश करण्यात आला आहे. पंतला गेल्या 2 सामन्यात संधी मिळाली नव्हती. तर अर्शदीप याच्या जागी रियान पराग याचा समावेश करण्यात आला आहे. रियान परागने यासह आपलं एकदिवसीय पदार्पण केलं आहे. विराट कोहली याने रियान परागला कॅप देऊन त्याचं टीम इंडियात स्वागत केलं. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेने एकमेव बदल केला आहे. अकिला धनंजय याच्या जागी महीश तीक्षणा याचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेने जिंकला टॉस, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग
🚨 Toss Update 🚨
Sri Lanka elect to bat in the 3rd ODI.
Follow the Match ▶️ https://t.co/Lu9YkAmnek#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/sUc2VQPP4B
— BCCI (@BCCI) August 7, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.