SL vs IND Odi Series: श्रीलंका-इंडिया वनडे सीरिजासाठी टीम जाहीर, कुणाला संधी?
Sri Lanka vs India Odi Series: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाने श्रीलंके विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. तर तिसरा आणि शेवटचा सामना हा 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या एकदिवसीय मालिकसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. चरित असलांका हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. तर रोहित शर्मा भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. वनडे सीरिजसाठी कुणला संधी मिळाली? हे आपण जाणून घेऊयात.
कसोटी कारकीर्दीची अप्रतिम सुरुवात करणाऱ्या निशान मदुश्का याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच आजारामुळे दुष्मंथा चमीराला वनडे सीरिजमधूनही बाहेर रहावं लागलं आहे. नुवान तुषारा याचाही समावेश करण्यात आलेला नाही. नुवानला टी 20 मालिकेआधी सरावादरम्यान दुखापत झाली होती. तुषारा या दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. दासुन शनाकालाही दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येणार नाही. टी 20 मालिकेनंतर या 3 सामन्यांच्या सीरिजचा श्रीगणेशा होणार आहे. हे तिन्ही सामने कोलंबोत 2, 4 आणि 7 ऑगस्टला आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत. या तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी श्रीलंका संघाची घोषणा
Sri Lanka announce the 16-man squad set to take on India in the upcoming ODI series! 🇱🇰🏏 https://t.co/M9uGq0ZHpw #SLvIND
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 30, 2024
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरित असलंका (कॅप्टन), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेल्लालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना आणि असिथा फर्नांडो.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.