SL vs IND: श्रीलंका-टीम इंडिया मालिकेदरम्यान कॅप्टन बदलला, आता नेतृत्व कुणाकडे?
Sri Lanka vs India Odi Series: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात 2 ऑगस्टपासून होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 टी 20I सामन्यांच्या मालिकेची सांगता ही 30 जुलैला होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेने या एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंकेने कुसल मेंडीस याला कर्णधारपदावरुन हटवलं आहे. तर टी 20I मालितकेत पहिल्यांदा कॅप्टन्सी करणाऱ्या चरित असलांका याला एकदिवसीय मालिकेचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.
चरित असलंका कॅप्टन
वानिंदु हसरंगा याच्या नेतृत्वात श्रीलंकेची टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली. श्रीलंकेचं आव्हान साखळी फेरीतचं संपुष्ठात आलं. वानिंदुने पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टी 20I कर्णधारपदी चरित असलांका याची नियुक्ती करण्यतात आली. त्यानंतर आता चरितला एकदिवसीय संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे. कुसल मेंडीस याने आतापर्यंत एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
रोहित-विराटचं कमबॅक
दरम्यान या एकदिवसीय मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या दोघांनी निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता हे वनडे सीरिजमध्ये खेळणार असल्याने या दोघांचं कमॅकक होणार आहे.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
असा आहे श्रीलंकेचा संघ
Your playing XI for the 3rd T20I. #SLvIND pic.twitter.com/vDwQjqZfCA
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 30, 2024
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरित असलंका (कॅप्टन), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेल्लालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना आणि असिथा फर्नांडो.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.