SL Vs PAK : पाकिस्तानकडून श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात मोठी चूक, भोगावी लागेल पराभवाची किंमत Watch Video
World Cup 2023, SL vs PAK: वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीने प्रत्येक रन आणि चेंडू महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक चूक चांगलीच महागात पडू शकते. पण पाकिस्तानच्या खेळाडूने नको ती चूक केली आणि आता...
मुंबई : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आठवा सामना सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुसल परेराच्या रुपाने पहिल्या झटका बसल्यानंतर श्रीलंका बॅकफूटला आली होती. दुसऱ्या षटकातच गडी बाद झाल्याने श्रीलंकन फलंदाजांवर दडपण दिसत होतं. बाबर आझम याने संघाचं चौथ षटक शाहीन आफ्रिदीला सोपवलं. कारण झटपट विकेट गेल्या तर श्रीलंकेवरील प्रेशर कायम राहील हा हेतू होता. पण पाकिस्तानी खेळाडूंनी नेहमीप्रमाणे माती खाल्ली. गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुन्हा एकदा नमुना दाखवला. शाहीनच्या चौथ्या चेंडूवर कुसल मेंडिसने हवेत शॉट खेळला. पण इमाम उल हकने पाकिस्तानला साजेशी कृती केली आणि झेल सोडला. यामुळे शाहीन शाहीन आफ्रिदी चांगलाच वैतागला होता. त्यानंतर कुसल मेंडिस याने मागे वळून पाहिलंच नाही.
कुसल मेंडिस याचा झेल सोडला तेव्हा अवघ्या 8 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने आफ्रिदीच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि आपला इरादा स्पष्ट केला. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. कुसल मेंडिस याने 77 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. आक्रमक खेळी करताना हसन अलीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. हा झेल इमाम उल हक यानेच घेतला. पण तिथपर्यंत वेळ निघून गेली होती.
Watch Imam-ul-Haq catch drop of Kusal Mendis when he was on 18(17).
He caught difficult catch and dropped simple catch 😂.#BANvENG #ENGvBAN #ENGvsBAN #ICCWorldCup2023 #ViratKohli #INDvAFG #INDvsAFG #PAKvSL #PAKvsSL #SLvPAK #SLvsPAK #KusalMendispic.twitter.com/dIYBK3l2ia
— CricWiz (@CricWizTalks) October 10, 2023
भारत ऑस्ट्रेलिया सामन्यातही अशीच चूक झाली होती. विराट कोहली 12 धावांवर असताना झेल सुटला आणि मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. केएल राहुलसोबत त्याने 165 धावांची खेळी केली. तसेच 85 धावा करून बाद झाला
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.