SLA vs AFGA Final : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान महामुकाबला, कोण होणार आशिया चॅम्पियन?

Sri Lanka A vs Afghanistan A Final : एमर्जिंग आशिया कप 2024 महाअंतिम सामन्यात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघ महाअंतम सामन्यासाठी सज्ज आहेत.

SLA vs AFGA Final : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान महामुकाबला, कोण होणार आशिया चॅम्पियन?
Sri Lanka A vs Afghanistan A Final PreviewImage Credit source: acc x account
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 4:28 PM

एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचा थरार आज 27 ऑक्टोबरला रंगणार आहे. महाअंतिम सामन्यात आशिया कप ट्रॉफीसाठी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. दरविश रसुली याच्याकडे अफगाणिस्तान ए संघाचं नेतृत्व करणार आहे. तर नुवानिदू फर्नांडो याच्याकडे श्रीलंका ए ची धुरा आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर हॉटस्टार एपवर मॅच पाहता येईल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस हईल. दोन्ही संघात आशिया चॅम्पियन होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेची कामगिरी

श्रीलंकेची साखळी फेरीतील सुरुवात पराभवाने झाली. अफगाणिस्तानने श्रीलंकेला 18 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात 11 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे श्रीलंकेकडे साखळी फेरीतील या सामन्याचा वचपा घेण्याची सुवर्णसंधी आहे. आता श्रीलंका या प्रयत्नात यशस्वी ठरते की अफगाणिस्तान पुन्हा श्रीलंकेला चितपट करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. श्रीलंकेने या पराभवानंतर हाँगकाँग आणि बांगलादेश विरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यानंतर श्रीलंकेने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला.

अफगाणिस्तानकडून टीम इंडिया चितपट

दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने साखळी फेरीची सुरुवात विजयाने केली. अफगाणिस्तानने सलग 2 सामने जिंकले. अफगाणिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत केलं. मात्र शेवटच्या सामन्यात हाँगकाँगने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. मात्र अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत आधीच प्रवेश निश्चित केल्याने हाँगकाँग विरूद्धच्या पराभवाचा काही फटका बसला नाही.

त्यानंतर अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत सलग 3 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाचा धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानेही चिवट प्रतिकार केला. मात्र टीम इंडियाला 7 विकेट्स गमावून 186 धावांपर्यंतच पोहचता आलं. अफगाणिस्तानने यासह अंतिम फेरीत धडक दिली. आता आशिया चॅम्पियन कोण ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

अफगाणिस्तान ए संघ : दरविश रसुली (कर्णधार), जुबैद अकबरी, सेदीकुल्लाह अटल, करीम जनात, मोहम्मद इशाक (विकेटकीपर), शराफुद्दीन अश्रफ, शाहीदुल्ला कमाल, अब्दुल रहमान, अल्लाह गझनफर, कैस अहमद, बिलाल सामी, नांगेलिया खरोटे, वफीउल्लाह तरखिल, नुमान शाह आणि फरीदून दाऊदझई.

श्रीलंका ए टीम : नुवानिदू फर्नांडो (कर्णधार), यशोधा लंका, लाहिरू उदारा (विकेटकीपर), अहान विक्रमसिंघे, सहान अरचिगे, पवन रथनायके, रमेश मेंडिस, दुशान हेमंथा, निमेश विमुक्ती, निपुण रंसिका, एशान मलिंगा, दिनुरा कालुपाहना, इसिथा विजेसुंदर, कविंदू नदीशन आणि लसिथ क्रोस्पुले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....