BEN vs MAH | ऋतुराज गायकवाड याची सनसनाटी खेळी, 16 बॉलमध्ये 66 धावा, व्हीडिओ
Ruturaj Gaikwad SMAT 2023 Bengal vs Maharashtra | एशियन गेम्समध्ये आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला गोल्ड मेडल मिळवून दिल्यानंतर ऋतुराज गायकवाड याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत धमाका सुरु ठेवला आहे.
मोहाली | सय्यद मुश्ताक अली 2023 स्पर्धेत महाराष्ट्राने केदार जाधव याच्या नेतृत्वात विजयी श्रीगणेशा केला आहे. महाराष्ट्राने बंगालचा 8 विकेट्सने धुव्वा उडवलाय. बंगलाने विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. महाराष्ट्राने हे आव्हान ऋतुराज गायकवाड याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर 14.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऋतुराजने 40 बॉलमध्ये 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
ऋतुराजने या दरम्यान जोरदार फटकेबाजी केली. तर केदारने शानदार 40 धावांची नाबाद खेळी करत टीमला विजयापर्यंत पोहचवलं. अझीम काझी याने नॉट आऊट 18 रन्स केल्या. तर अर्शीन कुलकर्णी 13 धावा करुन आऊट झाला. बंगालकडून आकाश दीप आणि प्रदीप्ता प्रामाणिक या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी महाराष्ट्रने टॉस जिंकला. कॅप्टन केदार जाधव याने बंगालला बॅटिंगसाठी बोलावलं. महाराष्ट्राच्या बॉलिंगसमोर बंगालची खराब सुरुवात झाली. अभिमन्यू इश्वरन पहिल्याच बॉलवर आऊट झाला. विकेटकीपर अभिषेक पोरेल 15 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन सुदीप घारामा याने 44 धावांचं योगदान दिलं. शहबाज अहमद याने 11 धावा केल्या. शकीर गांधी 9 धावांवर तंबूत परतला. ऋत्विक चौधरी याने 17 रन्स केल्या. तर रनजोत सिंह याने अखेरीस नाबाद 49 धावा केल्या. तर करण लाल याने नॉट आऊट 3 धावा केल्या. रनजोतने केलेल्या या खेळीमुळे 20 ओव्हरमध्ये 6 बाद 158 अशी मजल मारली.
महाराष्ट्राकडून अर्शीन कुलकर्णी याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर प्रशांत सोलंकी, अझीम काझी, विकी ओस्तवाल आणि प्रदीप दुधे याचौकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
ऋतुराज गायकवाड याची झंझावाती खेळी
Ruthless RUTURAJ GAIKWAD on duty in SMAT
Fifty from just 22 balls 🔥 Fours – 7 Six – 3#RuturajGaikwad #SMAT2023 #Olympics2028#Olympics #LoveIsBlind #SLvsAUS#AUSvSLpic.twitter.com/CWgQ6qKA0i
— ICT_FAN❤️🏏 (@IamRavindraNain) October 16, 2023
बंगाल प्लेईंग ईलेव्हन | सुदीप कुमार घारामी (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), रणजोत सिंग, शाहबाज अहमद, ऋत्विक चौधरी, करण लाल, प्रदीप्ता प्रामाणिक, आकाश दीप, मुकेश कुमार, इशान पोरेल आणि शाकीर गांधी.
महाराष्ट्र प्लेईंग ईलेव्हन | केदार जाधव (कॅप्टन), रुतुराज गायकवाड, मंदार भंडारी (विकेटकीपर), अजीम काझी, निखिल नाईक, अर्शीन कुलकर्णी, राजवर्धन हंगरगेकर, सिद्धार्थ म्हात्रे, धनराज शिंदे, प्रदीप दधे आणि विकी ओस्तवाल.