MUM vs MP Final : 6 षटकार-6 चौकार, कॅप्टन रजत पाटीदारची विस्फोटक खेळी, मुंबईसमोर 175 धावांचं आव्हान
Smat Final 2024 : कॅप्टन रजत पाटीदार याच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने मुंबईसमोर 175 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
सय्यद मु्श्ताक अली ट्रॉफी 2024 अंतिम फेरीतील सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मध्य प्रदेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. कॅप्टन रजत पाटीदार याने केलेल्या स्फोटक नाबाद खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशला 170 पार मजल मारता आली. कॅप्टन रजत पाटीदार याने 40 चेंडूत 6 सिक्स आणि 6 फोरसह 202.50 च्या स्ट्राईक रेटने 81 धावांची नाबाद खेळी केली.तर इतर फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत चांगली साथ दिली. हा महाअंतिम सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवणयात येत आहे.
मध्य प्रदेशची बॅटिंग
मध्य प्रदेशसाठी रजत पाटीदार याने सर्वाधिक 81 धावांची नाबाद खेळी केली. मात्र त्या व्यतिरिक्त इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. सुभ्रांशू याने 17 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीने 23 धावा केल्या. राहुल बाथम याने 14 चेंडूत 1 सिक्स आणि 1 फोरसह 19 धावा केल्या. वेंकटेश अय्यर याने निराशा केली. वेंकटेशने 9 बॉलमध्ये 17 रन्स केल्या . तर हरप्रीत सिंगने 15 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कुणालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मुंबईकडून शार्दूल ठाकुर आणि रोयस्टन डायस या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अथर्व अंकोलेकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेंडगे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुंबईसमोर 175 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
An explosive finish 🔥🔥
Mumbai need 175 to win the Final!
We are all set for a thrilling chase
Live – https://t.co/4J8WAjUsK9#SMAT | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nFZaxYWxbs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 15, 2024
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर.
मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय आणि आवेश खान.