6,6,6,6,4,4,4,4,4, Prithvi Shaw याला सूर गवसला, निर्णायक सामन्यात स्फोटक खेळी
Prithvi shaw Batting : टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर असलेला पृथ्वी शॉ याने सय्य मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यात तडाखेदार खेळी केली आहे.
पृथ्वी शॉ याला गेल्या काही महिन्यांपासून टीकेचा ‘सामना’ करावा लागतोय. क्रिकेटमधील अपयश आणि वैयक्तिक जीवनातील वादांमुळे पृथ्वी टीकेचा धनी ठरला. पृथ्वीला या दरम्यान बॅटिंगनेही काही खास करता आलं नाही. पृथ्वी काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्येही अनसोल्ड राहिला. त्यामुळे पृथ्वीवर नेटकऱ्यांनीही टीका केली. मात्र पृथ्वीला अखेर सूर गवसला आहे. पृथ्वीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील निर्णायक सामन्यात तडाखेदार खेळी करुन टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.
पृथ्वीची स्फोटक खेळी, रहाणेसोबत कडक सुरुवात
पृथ्वीने मुंबई विरुद्ध विदर्भ चौथ्या उपांत्य पूर्व सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेसोबत स्फोटक सुरुवात करुन दिली. विदर्भाने मुंबईला विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. पृथ्वीने या धावांचा पाठलाग करताना अपेक्षित सुरुवात मिळवून दिली. पृथ्वीने तोडफोड खेळी करत विदर्भाच्या गोलंदाजांची पिसं काढली. मात्र पृथ्वी त्याच्या खेळीचा शेवट गोड करु शकला नाही. पृथ्वीचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं.
पृथ्वीने अवघ्या 26 बॉलमध्ये 188.46 च्या स्ट्राईक रेटने 4 सिक्स आणि 5 फोरसह 49 धावा केल्या. पृथ्वीने सिक्स आणि फोरसह एकूण 9 चेंडूत 44 धावा केल्या. तसेच अजिंक्यसह 83 धावांची सलामी भागीदारी करुन मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. पृथ्वीला दिपेश पर्वानी याने दर्शन नळकांडे याच्या हाती कॅच आऊट केलं.
पृथ्वी शॉ याचा झंझावात
PRITHVI SHAW MADNESS….!!!!
– 49 from just 26 balls in the Quarter Final while chasing 222 runs against Vidarbha, What a knock from the Madman 🤯🔥 pic.twitter.com/TDd1QnCiwl
— Johns. (@CricCrazyJohns) December 11, 2024
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : जितेश शर्मा (कर्णधार आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, करुण नायर, पार्थ रेखाडे, मंदार महाले, शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, दर्शन नळकांडे, यश ठाकूर आणि दीपेश परवानी