Smriti Mandhana: ऑस्ट्रेलियाला धुतल्याच स्मृती मांधनाला मिळालं इनाम, करिअरमध्ये गाठला मोठा टप्पा
Smriti Mandhana: स्मृती मांधनाला मिळालं मेहनतीच फळ.
मुंबई: अलीकडेच महिला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. यात भारताच्या विजयात स्मृती मांधनाने महत्त्वाच योगदान दिलं. ती 79 धावांची शानदार इनिंग खेळली. मांधनाला या शानदार फलंदाजीच इनाम दुसऱ्यादिवशी मिळालं. मंगळवारी आयसीसी वुमेन्स टी 20 इंटरनॅशनल रँकिंग जाहीर झाली. यात फलंदाजांच्या यादीत तिने करिअरमधील सर्वश्रेष्ठ रेटिंग मिळवलय. तिचे 741 पॉइंट्स झालेत. सध्या ती तिसऱ्या स्थानावर आहे.
सुपरओव्हरमध्ये विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे इंटरनॅशनलमध्ये तिची सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्या सामन्यात तिला 11 रेटिंग पॉइंटचा फायदा झाला. दुसरा वनडे सामना टाय झाल्यानंतर भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
क्रमवारीत सुधारणा
ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅग्राथने भारताविरुद्ध पहिल्या दोन टी 20 सामन्यात चांगली कामगिरी केली. ती नंबर एक फलंदाज बनली आहे. ताहिलाने भारताविरुद्ध 40 आणि 70 रन्सची इनिंग खेळली होती. महिला टी 20 इंटरनॅशनल रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचलेली ऑस्ट्रेलियाची दुसरी फलंदाज आहे. तिच्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली. तिने तिच्याच देशाच्या मेग लेनिंग आणि बेथ मूनी यांच्याशिवाय मांधनाला मागे टाकलं. ऑगस्ट महिन्यात मूनीने लेनिंगला मागे टाकून नंबर एकच स्थान पटकावलं होतं.