लॉर्ड्स कसोटीत रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाबाबत निर्णय होणार?, गांगुलीसह संघ व्यवस्थापनात चर्चा

भारतीय क्रिकेटसंघामध्ये लवकरत काही मोठे बदल होऊ शकतात. आगामी टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री बदलण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे.

लॉर्ड्स कसोटीत रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाबाबत निर्णय होणार?, गांगुलीसह संघ व्यवस्थापनात चर्चा
सौरव गांगुली आणि रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 6:27 PM

लंडन : भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनात (Indian Team) मागील बऱ्याच काळापासून काही मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना बदलणार असल्याची बातमी सतत समोर येत असते. या संबधित एक नवीन अपडेट समोर आला आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्स (Lords Test) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान या बदलाबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यासह इतर अधिकारी लंडनमध्ये या सामन्याला हजेरी लावणार असून यावेळी ते प्रशिक्षक रवी शास्त्रीं यांच्याशी प्रशिक्षक पदाबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ”रवी शास्त्री यांचा कार्यकाळ काही महिन्यांत संपणार असून त्यामुळे त्यांचा करार वाढवण्याबाबत बीसीसीआय चर्चा करणार आहे. लॉर्ड्स येथे सध्या सुरु असलेल्या कसोटीदरम्यान ही चर्चा करणे थोडे लवकर असले तरीही बीसीसीआय़ अध्यक्ष, सचिव आणि शास्त्री स्वत: त्याठिकाणी असल्याने ही योग्य वेळ आहे.”

रवी शास्त्रींच्या कार्यकाळात ICC जेतेपद नाहीच

दरम्यान, रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडिया 2019 वर्ल्डकप सेमीफायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभूत झाली. आतापर्यंत रवी शास्त्री यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकली नाही.

परदेशात जबरदस्त कामगिरी

भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकला नसला तर रवी शास्त्रींच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी केली. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दोन वेळा कसोटी मालिकेत पराभूत केलं. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंडमध्ये जाऊन जबरदस्त कामगिरी केली.

याशिवाय भारतात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या बलाढ्य संघांवर मात दिली. याशिवाय गेल्या काही दिवसात भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथही सुधारली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2-1 ने विजय मिळवून देण्यात बेंच स्ट्रेंथचा मोठा वाटा होता.

संबंधित बातम्या 

भारताच्या धडाकेबाज महिला क्रिकेटपटूची इंग्लंडमध्ये हवा, 22 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला मिळवून दिला विजय

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश

IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीवर दुसरा कसोटी सामना, विराटसह भारतीय फलंदाजांचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चिंताजनक

(Sourav ganguly and BCCI members may decide ravi shastris future as team india coach at london test)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.