IND vs SL:’जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’, साहाचा सौरव गांगुलीबद्दल धक्कादायक खुलासा
IND vs SL: ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आता भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाहीय. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऋद्धिमान साहाला संघातून डच्चू देण्यात आला आहे.
कोलकाता: ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आता भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाहीय. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऋद्धिमान साहाला संघातून डच्चू देण्यात आला आहे. संघ निवडीमध्ये त्याचा विचार झालेला नाही. कसोटी संघात स्थान न मिळाल्यामुळे ऋद्धिमान साहा संतप्त झाला आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संदर्भातही ऋद्धिमान साहाने वक्तव्य केलं आहे. ऋद्धिमान साहाने जे दावे केलेत, त्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो. कानपूर कसोटीनंतर साहाला सौरव गांगुलीकडून (Sourav Ganguly) दिलासा मिळाला होता. सौरव गागुंलीकडून त्याला आश्वासन मिळालं होतं. पण तसं घडलं नाही. त्यामुळे त्याने मीडियासमोर येऊन खळबळजनक विधानं केली आहेत, ज्यातून नवीन वाद निर्माण होईल.
काय होता तो मेसेज
कानपूर कसोटीत मी न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यावेळी सौरव गांगुली यांच्याकडून मला एक व्हॉट्स अॅप मेसेज आला होता. त्यामध्ये ‘जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’ असं लिहिलं होतं. सौरव गांगुलीकडून आलेल्या त्या मेसेजने माझा आत्मविश्वास वाढवला. पण आता अचानक सर्वकाही बदललं आहे, असं ऋद्धिमान साहाने सांगितलं.
मान दुखापतग्रस्त असूनही केल्या 61 धावा
मागच्यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना झाला. त्यावेळी ऋद्धिमान साहाची मान दुखापतग्रस्त होती. मान दुखत असूनही त्याने नाबाद 61 धावांची खेळी केली. साहाची हालत इतकी खराब होती की, त्याच्याजागी केएस भरतने विकेटकिपिंग केली. साहाच्या त्या खेळीचं सौरव गांगुलीने कौतुक केलं होतं. “न्यूझीलंड विरुद्धच्या त्या 61 धावांच्या खेळीनंतर दादा म्हणजे सौरव गांगुलीने व्हॉट्स अॅप मेसेजवरुन मला शुभेच्छा दिल्या. जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील” असही त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं असं साहाने सांगितलं. “इथून पुढे संघनिवडीसाठी तुझा विचार होणार नाही. त्यामुळे तू आता निवृत्तीचा विचार कर” असं हेड कोच राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने आपल्याला सांगितल्याचा दावा ऋद्धिमान साहाने केला आहे.
Sourav ganguly said as long as i am in bcci you would be in team wriddhiman saha