AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल आधी या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 17 वर्षांचं क्रिकेट करिअर, दिल्लीच्या संघातही समावेश

दिल्ली डेअरडेविल्सचा (delhi daredevils) माजी खेळाडू रॉबी फ्रीलिंक (Robbie Frylinck) याने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय.

आयपीएल आधी या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, 17 वर्षांचं क्रिकेट करिअर, दिल्लीच्या संघातही समावेश
Robbie Frylinck
| Updated on: Mar 31, 2021 | 1:32 PM
Share

मुंबईआयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. त्याअगोदर दिल्ली डेअरडेविल्सचा (delhi daredevils) माजी खेळाडू रॉबी फ्रीलिंक (Robbie Frylinck) याने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय. साऊथ आफ्रिकेकडून खेळताना त्याने काही अविस्मरणीय इनिंग खेळल्या. तसंच आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाचाही तो भाग राहिला. आयपीएल 2011 च्या हंगामात रॉबी फ्रीलिंक दिल्लीकडून खेळला. (South Africa All Rounders Robbie Frylinck retirement From IPL Cricket)

रॉबीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द थोडी कमी राहिली पण त्याने देशांतर्गत क्रिकेट गाजवलं. त्याच्या17 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये त्याने 500 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. साऊथ आफ्रिलेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने निवृत्तीच्या निर्णयानंतर त्याला उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका संघात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूमध्ये गणना

रॉबीने 2004 साठी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. 2005 मध्ये फर्स्ट क्लासमध्ये पदार्पण केलं. 2008 मध्ये त्याने नायवेल्ड लॉइंसकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्याने स्वतला एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध केलं होतं. त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचे लांस क्लूजनर यांच्याशी केली गेली. रॉबीचा 2011 मध्ये दिल्लीच्या संघात समावेश झाला होता. परंतु दिल्लीच्या संघाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. नंतर त्याला रिलीज केलं गेलं. त्यानंतर त्याने 2017 साली बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये टारगर्स संघाकडून खेळला.

निवृत्तीची घोषणा करताना डोळ्यात पाणी

निवृतीवेळी रॉबी भावूक झाल्याचं पाहायला मिळाला. तो म्हणाला, कोणताही खेळाडू आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अशा क्षणाची वाट पाहत नाही ज्या क्षणाला त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आज मी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतोय. 17 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये मला अनेक सुखद क्षण अनुभवायला मिळाले, असं म्हणत रॉबीने क्रिकेट रसिकांचे आभार मानले.

रॉबी फ्रीलिंकचं क्रिकेट करिअर

रॉबीने साऊथ आफ्रिकेसाठी 3 टी ट्वेन्टी सामने खेळले. ज्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या. तर 75 फर्स्ट मॅच खेळताना त्याने 228 विकेट्स मिळवल्या. यामध्ये 30 रन्समध्ये त्याने 8 फलंदाजांना माघारी धाडलं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 11 वेळा 5 विकेट्स पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या.. तसंच दोन वेळा 10 विकेट्स मिळवल्या. रॉबीने 137 लिस्ट ए मॅचमध्ये 168 विकेट्स मिळवल्या.

(South Africa All Rounders Robbie Frylinck retirement From IPL Cricket)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नईच्या भविष्याविषयी महत्त्वाची ‘आकाशवाणी’, ‘पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट!’

मोठी बातमी : भारत पाकिस्तान आमने-सामने येणार, एप्रिलमध्ये तिरंगी टी ट्वेन्टी मालिका

IPL 2021 : सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत रिषभ पंत दिल्लीच्या कर्णधारपदी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं ‘ट्रोलिंग वर्क!’

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.