टी-20 World Cup 2024 आधी निवृत्त कॅप्टन परतणार? टीमची ताकद होणार दुप्पट!

T-20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपला काही महिन्यांवर आला आहे. त्याआधी निवृत्त कॅप्टनने आपण संघात परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोण आहे तो निवृत्त कर्णधार? क्रिकेट बोर्ड त्याला परत खेळण्याची संधी देणार का?

टी-20 World Cup 2024 आधी निवृत्त कॅप्टन परतणार? टीमची ताकद  होणार दुप्पट!
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 7:58 PM

मुंबई : वन डे वर्ल्ड कप नुकताच संपला असून आता सर्व संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 ची तयारी केली जात आहे. टीम मॅनेजमेंट वर्ल्ड कप संघबांधणीच्या कामाला लागलेले दिसत आहेत. आगामी टी-20 वर्ल्डकपचं यजमानपद हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे असणार आहे. वर्ल्ड कप आधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टी-20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा खेळाडू परत आपल्या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. या खेळाडूने देशाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून फाप डू प्लेसिस आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 आधी डू प्लेसिसने टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. डू प्लेसिस आताही टी-20 क्रिकेटच्या लीगमध्ये खेळताना दिसतो. निवृत्त झाला असला तरी फाफ अजुनही दर्जेदार कामगिरी करताना दिसत आहे.

कमबॅकबाबत डू प्लेसिस काय म्हणाला?

मला वाटतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. याबाबत मी गेल्या अने दिवसांपासून विचार करत आहे. मात्र टी-20 वर्ल्ड कपसाठी कोणत्या प्रकारच्या योजना आखल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत मी माझ्या नवीन कोचसोबतही बोललो असल्याचं फाफ डू प्लेसिस याने म्हटलं आहे.

फाफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी फ्रँचायझी लीगमध्ये कडक फलंदाजी करत आहे. आयपीएलमध्ये फाफकडे आरसीबी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सीएसके संघानंतर फाफ आरसीबी संघाकडून खेळत आहे.

दरम्यान, फाफ डू प्लेसिस याने 69 कसोटीत 4163 धावा, 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5507 धावा आणि 50 टी-20 मध्ये 1528 धावा कल्या आहेत. फाफ डू प्लेसिसच्या नावावर 23 आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर आयपीएलमध्येही त्याने 130 सामन्यांमध्ये 4 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.