SA vs IND : पहिल्या वन डे मध्ये साऊथ आफ्रिकेने यंगिस्तानसमोर टेकले गुडघे, अर्शदीपचा ‘पंजा’

SA vs IND 1st oODI : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेने बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाच्या बॉलर्सनी यजमानांना ऑल आऊट केलं आहे. टीम इंडियाचे गोलंदाज अर्शदीप आणि आवेश यांच्या घातक माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत.

SA vs IND : पहिल्या वन डे मध्ये साऊथ आफ्रिकेने यंगिस्तानसमोर टेकले गुडघे, अर्शदीपचा 'पंजा'
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 4:25 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्य पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारतीय बॉलर्ससमोर आफ्रिकेच्या संघाने गुडघे टेकवले आहेत. या सामन्यामध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिका संघाला डाव टीम इंडियाने  27.3 ओव्हरमध्ये 116  धावांवर गुंडाळलं. अर्शदीप सिंह आणि आणि आवेश खान यांच्या घातक गोलंदाजीसमोर आफ्रिका संघाचा निभाव लागला नाही. अर्शदीपने पहिल्यांदाचा पाच विकेट घेत शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

आफ्रिका संघाचा डाव

साऊथ आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन ओपनिंगला उतरले होते, दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने रीझा हेंड्रिक्स 0 धावा आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन 0 धावांवर आऊट केलं. अर्शदीप हॅट्रिकवर होता मात्र एडन मार्करमने हॅट्रिक होऊ दिली नाही. त्यानंतर परत अर्शदीपने टोनी डी झोर्झी 28 धावा आणि हेनरिक क्लासेन 6 धावा या दोघांना माघारी पाठवलं आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं.

अर्शदीपनंतर आवेश खान याने आपला जलवा दाखवला, आवेशनेही त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या, त्यालाही हॅट्रिकची संधी होती मात्र ती पूर्ण झाली नाही. आवेशने एडन मार्करम 12 धावा  डेव्हिड मिलर 2 धावा, विआन मुल्डरला 0 धावा आणि केशव महाराजला 4 धावांवर माघारी पाठवलं. आफ्रिकेकडून अँडिले फेहलुकवायो आणि नांद्रे बर्गर यांनी  विकेट पडू दिल्या नाहीत.

भारतीय वेगवान गोलंदाजांना दोघांनी तंगवलं होतं मात्र परत एकदा अर्शदीप याने फेहलुकवायो याला 33 धावांवर आऊट करत माघारी पाठवलं. या विकेटसह अर्शदीपने वन  डे मध्ये पहिल्यांदा पाच विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. कुलदीप यादव याने शेवटची विकेट घेत आफ्रिकेला 116 धावांवर ऑल आऊट केलं.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.