BCCI Contracts: ‘या’ दोन क्रिकेटपटूंकडे बोर्डाने केलं साफ दुर्लक्ष, दोघांच कोट्यवधी रुपयांचं नुकसान
BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. यंदा खेळाडूंबरोबर करार करताना मोठे बदल केल्याचं पहायला मिळत आहे.
मुंबई: BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. यंदा खेळाडूंबरोबर करार करताना मोठे बदल केल्याचं पहायला मिळत आहे. फॉर्ममध्ये नसलेल्या अनेक खेळाडूंच्या पैशांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. हे नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर झाल्यानंतर अनेक खेळाडू निराश झाले असतील, पण दोन खेळाडूंना सर्वात जास्त वाईट वाटलं असेल. ज्यांना बीसीसीआयने सी-ग्रेडच्या योग्यतेचे सुद्धा समजलेलं नाही. म्हणजे ते दोन जण आता BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Contracts) सिस्टिमचा भाग राहिलेले नाहीत. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) यांना भारतीय बोर्डाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिलेलं नाही. एकप्रकारे त्यांचे पंख छाटण्यात आले आहेत.
बीसीसीआयने करार न करण्याचा अर्थ असाच आहे की, या दोघांना आता बोर्डाकडून वर्षाला कोट्यवधी रुपये मिळणार नाहीत. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षाला कोट्यवधी रुपये मिळतात. परफॉर्मन्स या एकमेव निकषावर खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान दिले जाते.
दोघे ग्रुप सी मधून बाहेर
बीसीसीआयच्या मागच्या करारानुसार कुलदीप यादव आणि नवदीप सैनी हे दोघे ग्रुप सी मध्ये होते. पण आता नव्या करारात या दोघांना या ग्रेडमधून सुद्धा हटवण्यात आलं आहे. त्यामुळे दोघांना आता वर्षाला बोर्डाकडून मिळणारे एक कोटी रुपये सुद्धा मिळणार नाहीत. बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टनुसार, ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये मिळतात. ए ग्रेड मधील खेळाडूंना पाच कोटी, ग्रेड-बी आणि सी च्या खेळाडूंना वर्षाला अनुक्रमे तीन आणि एक कोटी रुपये मिळतात.
किती जणांबरोबर केला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मागच्या करारात 28 क्रिकेटपटूंबरोबर सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट केला होता. पण यावेळी फक्त 27 क्रिकेटपटूंबरोबर सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट केला आहे. नव्या करारात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह ए प्लस कॅटेगरीत आहेत. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना खराब फॉर्ममुळे ग्रेड बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. जे आधी ग्रेड ए मध्ये होते. रहाणे आणि पूजारा हे दोघे आता कसोटी संघाचेही सदस्य नाहीयत.
spinner kuldeep yadav and pacer navdeep saini have been dropped from bcci contract list