IPL 2021: आजच्या CSK vs SRH सामन्यात चेन्नईवर पराभवाचे सावट, ‘हे’ आहे कारण
आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची लढत आज सर्वात खाली असणाऱ्या सनरायजर्स हैद्राबादशी असली तरी हा सामना हैद्राबाद जिंकू शकते. याला काही खास कारणं आहेत.

IPL 2021: अत्यंत चुरशीत सुरु असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामात (IPL 2021) आता हळूहळू काही संघ प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करत आहे. आजचा 43 वा सामना आज सनरायजर्स हैद्राबाद (SRH) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्यात असून यात विजयानंतर धोनीची टीही प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित करेल. पण हा सामना जिंकणं चेन्नईसाठी तसं अवघड असणार आहे. यामागे कारण सनरायजर्स हैद्राबादचा परत आलेला फॉर्म आणि दाखल झालेला टी-20 स्पेशलिस्ट फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) हे आहे.
हैद्राबाद संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी अत्यंत खराब आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात 10 पैकी केवळ 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना 4 गुणांसह शेवटच्या स्थानावर रहावं लागलं आहे. पण अशातच त्यांनी सोमवारी (27 सप्टेंबर) राजस्थान संघाला तब्बल 7 विकेट्सनी मात देत एकप्रकारे यशस्वी पुनरागमन केलं आहे. यावेळी संघाचा धाकड फलंदाज जेसन रॉयनेही यंदाच्या हंगामात पदार्पण केल्याने संघ आणखी ताकदवर झाला आहे. त्यामुळे हैद्राबादचा आत्मविश्वास वाढला आहे. ज्यामुळे चेन्नईला हैद्राबादचा वाढलेला आत्मविश्वास, पुन्हा आलेला फॉर्म आणि जेसन रॉय या तीन गोष्टीमुळे पराभव पत्करावा लागू शकतो.
The #Risers return to Sharjah tonight to face Chennai Super Kings.#SRHvCSK #IPL2021 #OrangeArmy #OrangeOrNothing pic.twitter.com/9OW5xC6XR1
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 30, 2021
हैद्राबाद विरुद्ध चेन्नई Head to Head
चेन्नई आणि हैद्राबादचे संघ आतापर्यंत 16 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी तब्बल 12 सामने जिंकत चेन्नईने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. तर हैद्राबाद केवळ 4 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. दरम्यान राजस्थानला पराभूत करुन हैद्राबादने मिळवलेला विजय आजच्या सामन्यात मिळवण्यातही ते यशस्वी राहणार का हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.
आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11
चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड
सनरायजर्स हैद्राबाद – डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), विराट सिंग, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा
हे ही वाचा
IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय
IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण
IPL 2021 : मॉर्गनसोबतच्या वादावर आर. अश्विनचं सडेतोड उत्तर, टीकाकारांची पोलखोल करत केली बोलती बंद
(SRH return form and jason roys inclusion may beat CSK in todays IPL match between SRH vs CSK)