AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG IPL Match Result: अरेरे, आजही ‘ती’ निराश झाली, लखनौचा संघ का जिंकला? सनरायजर्स हैदराबादचं कुठे चुकलं? जाणून घ्या….

SRH vs LSG IPL Match Result: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super giants) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. लखनौचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यांनी दोन विजय मिळवले आहेत.

SRH vs LSG IPL Match Result: अरेरे, आजही 'ती' निराश झाली, लखनौचा संघ का जिंकला? सनरायजर्स हैदराबादचं कुठे चुकलं? जाणून घ्या....
IPL 2022: लखनौचा हैदराबादवर विजय Image Credit source: ipl/instagram
| Updated on: Apr 04, 2022 | 11:59 PM
Share

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super giants) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. लखनौचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यांनी दोन विजय मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) 211 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य पार केलं. आज तिसऱ्या सामन्यात त्यांनी 169 धावांचा यशस्वी बचाव केला. लखनौच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावली. त्याचा लखनौ सुपर जायंट्सला फायदा झाला. आज नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामना झाला. आपीएल 2022 मधील हा 12 वा सामना होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. लखनौने विजयासाठी 170 धावाचे लक्ष्य दिले होते. SRH ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. SRH च्या सलग दुसऱ्या पराभवामुळे या संघाची मालकीण काव्या मारन पुन्हा एकदा निराश झाली आहे.

  1. 27 धावात लखनौचे तीन विकेट गेले होते. त्यावेळी कॅप्टन केएल राहुल आणि दीपक हुड्डामध्ये चौथ्या विकेटसाठी 87 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली.
  2. केएल राहुलने आज कॅप्टन इनिंग्स खेळत शानदार अर्धशतक झळकावलं. संघाच्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या. त्याने 50 चेंडूत 68 धावा केल्या. केएल राहुलला पहिल्या सामन्यात खात सुद्धा उघडता आलं नव्हतं. दुसऱ्या सामन्यात 40 धावा करुन त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राहुलची अर्धशतकाची संधी हुकली होती.
  3. पहिल्या सामन्यापासून दीपक हुड्डा फॉर्ममध्ये आहे. आजही त्याने 51 धावांची केलेली खेळी निर्णायक ठरली. 33 चेंडूत 51 धावा फटकावताना त्याने तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले. संघासाठी पुन्हा एकदा तो संकटमोचक ठरला. गुजरात टायटन्स विरुद्धही त्याने अर्धशतकी खेळी केली होती.
  4. SRH ला चांगली सुरुवात मिळाली नाही. कॅप्टन केन विलियमसन अवघ्या 16 धावांवर स्कूप खेळण्याच्या नादात बाद झाला. सनरायजर्सला सामना जिंकण्यासाठी विलियमसन खेळपट्टीवर जास्त वेळ टिकणं आवश्यक आहे.
  5. कृणाल पंड्याने एडन मार्कराम आणि राहुल त्रिपाठीची जमलेली जोडी फोडली. कृणालने मार्करामला राहुल करवी झेलबाद केलं. त्यानंतर चांगली फलंदाजी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला 44 धावांवर कृणालने रवी बिश्नोईकरवी झेलबाद केलं.
  6. SRH च्या डावात 17 वी ओव्हर निर्णायक ठरली. आवेश खानने या ओव्हरमध्ये निकोलस पूरन आणि अब्दुल समदची पाठोपाठच्या चेंडूवर विकेट काढली. केन विलियमसनलाही त्यानेच बाद केलं. चार षटकात 24 धावा देऊन त्याने चार विकेट काढल्या.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.