SRH vs RCB Prediction Playing XI IPL 2022: RCB सिराजला बसवणार? बँगलोरला दणके देणाऱ्या बॉलरला SRH संधी देईल?
SRH vs RCB Prediction Playing XI IPL 2022: हैदराबादसमोर अनेक प्रश्न आहेत. कॅप्टन केन विलियमसन फेल होतोय. मधल्याफळीवर दबाव येत आहे. सलग तीन सामने त्यांनी गमावले आहेत.
मुंबई: IPL 2022 मध्ये लीग स्टेजचा शेवटचा टप्पा सुरु आहे. फक्त काही सामन्यात प्लेऑफचं चित्र स्पष्ट होईल. तीन ते चार टीम्समध्ये प्लेऑफची कडवी शर्यत आहे. रविवारी अशाच दोन संघांचा वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. पॉइंटस टेबलमध्ये (Points Table) मध्यावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (RCB vs SRH) सामना होणार आहे. दोन्ही टीम्स हा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB ने आतापर्यंत फार कमी बदल केले आहेत. आरसीबीच्या प्लेइंग इलेवनमध्ये एकसमानता दिसली आहे. सीजनच्या चांगल्या सुरुवातीनंतर बँगलोरचा सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला हरवून बँगलोरची टीम विजयी मार्गावर परतली आहे.
मोहम्मद सिराजला बसवणार?
CSK विरुद्ध RCB ने प्रत्येक विभागात जवळपास चांगलं प्रदर्शन केलं. विराट कोहलीने वेगाने धावा जमवल्या नाही. पण फाफ डू प्लेसीस सोबत मिळून पावरप्लेमध्ये त्याने चांगली फलंदाजी केली. मोहम्मद सिराजचा फॉर्म आरसीबीसाठी चिंतेचा विषय आहे. पावरप्लेमध्ये सिराज महागडा गोलंदाज ठरत असून विकेटही मिळवत नाहीय. त्यामुळे सिराज बद्दल कुठला निर्णय घेतला जातो का? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
RCB ला दणका देणाऱ्या बॉलरला SRH संधी देणार?
हैदराबादसमोर अनेक प्रश्न आहेत. कॅप्टन केन विलियमसन फेल होतोय. मधल्याफळीवर दबाव येत आहे. सलग तीन सामने त्यांनी गमावले आहेत. गोलंदाजांनी एसआरएचला निराश केलं आहे. भुवनेश्वर कुमार टीमसाठी प्रभावी ठरला आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीचा वेग वाढलाय. पण त्याला मार देखील तितकाच बसलाय. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर फिट होऊन मैदानावर उतरतील, अशी एसआरएचला अपेक्षा आहे. ते दोघे संघात परतले, तर प्लेइंग इलेवनमध्ये बदल होऊ शकतो. मागच्या काही सामन्यात खराब गोलंदाजी करणाऱ्या मार्को जॅनसेनला संधी मिळते का? त्याकडेही लक्ष असेल. सीजनमधली पहिल्या सामन्यात एसआरएच समोर बँगलोरचा डाव 68 धावात आटोपला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याचा बँगोलरचा प्रयत्न असेल.
SRH vs RCB संभाव्य प्लेइंग इलेवन
SRH: केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, श्रेयस गोपाल/वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन/शॉन एबॉट, उमरान मलिक आणि कार्तिक त्यागी,
RCB: फाफ डूप्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोड, दिनेश कार्तिक शहाबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज