Captain Resign : भारत-श्रीलंका सीरीजची घोषणा, कॅप्टनने घेतला राजीनाम्याचा निर्णय, टीमला मोठा धक्का
Indis vs Srilanka : टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील सीरीजची घोषणा झाली आहे. येत्या 26 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होत आहे. मात्र त्याआधीच कॅप्टनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमवता वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाला रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्त्वात वर्ल्ड कप जिंकून दिला. टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड याचा आता कार्यकाल संपला आहे. तर माजी खेळाडू गौतम गंभीर याची बीसीसीआयने मुख्य हेडकोचपदी नियुक्ती केली आहे. टीम इंडिया कोच म्हणून गंभीरच्या नेतृत्त्वात श्रीलंका दौरा करणार आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीमच्या कॅप्टटनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. यामधील पहिला टी-20सामना 26जुलैपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. त्याआधी श्रीलंका संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे.
National Men’s T20I Captain Wanindu Hasaranga has decided to resign from the captaincy.
READ: https://t.co/WKYh6oLUhk #SriLankaCricket #SLC
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 11, 2024
- पहिला T20I – 26 जुलै 2024
- दुसरी T20I – 27 जुलै 2024
- तिसरा T20I – 29 जुलै 2024
- पहिला एकदिवसीय सामना – 1 ऑगस्ट, 2024
- दुसरा एकदिवसीय सामना – 4 ऑगस्ट, 2024
- तिसरा एकदिवसीय सामना – 7 ऑगस्ट 2024
2024 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघाची खराब कामगिरी राहिली होती. 2014 साली विजेतेपद जिंकणारा श्रीलंका संघ पहिल्याच फेरीमधून बाहेर पडला होता. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कोच ख्रिस सिल्व्हरवुड आणि सल्लागार प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपला राजीनामा दिला होता. आती टीम इंडियाविरूद्धच्या टी-20 मालिकेला काही दिवस बाकी असताना हसरंगाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.