SL vs PAK Test: Babar Azam एकटा नडला, शेवटचा फलंदाज नसीम शाहने सुद्धा जिद्द सोडली नाही, श्रीलंकेवर पाकिस्तानचा पलटवार
SL vs PAK Test: श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) मध्ये सुरु असलेल्या गॉल कसोटी सामन्याचा (Test Match) आज दुसरा दिवस होता. दुसऱ्यादिवशी सुद्धा गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.
मुंबई: श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) मध्ये सुरु असलेल्या गॉल कसोटी सामन्याचा (Test Match) आज दुसरा दिवस होता. दुसऱ्यादिवशी सुद्धा गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. पहिल्यादिवशी पाकिस्तानने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेचा डाव लवकर गुंडाळला. दुसऱ्यादिवशी श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या नाकीनाऊ आणले. पाकिस्तानने आधी 100 रन्स मध्ये 7 आणि 150 धावांच्या आत 9 विकेट गमावले होते. पण तरीही पाकिस्तानने 218 धावा केल्या. याचं कारण आहे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम. (Babar Azam) दोन महिन्यांच्या आत बाबर आझमने झुंजार खेळी करुन शानदार शतक झळकावलं. बाबर आझमने या दरम्यान माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला.
पाकिस्तानी कॅप्टन लढला
गॉल टेस्टच्या दुसऱ्यादिवशी रविवारी पाकिस्तानने पहिल्या सत्रात पाच विकेट गमावले. म्हणजे पहिल्या सत्राच्या खेळ संपताना पाकिस्तानच्या एकूण 7 विकेट गेल्या होत्या. कॅप्टन बाबर आजम खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. लंच पर्यंत त्याने स्वत:च अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अखेरच्या फलंदाजांना साथीला घेत भागीदारी केली. संघाची धावसंख्या 150 पर्यंत पोहोचवली. संघाची धावसंख्या 148 होईपर्यंत पाकिस्तानच्या नऊ विकेट गेल्या होत्या. पाकिस्तानचा डाव 160-170 धावात आटोपणार अशी शक्यता दिसत होती. पण असं घडलं नाही.
बाबर आजमचं शानदार शतक
पाकिस्तानी कॅप्टनने श्रीलंकेच्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीने जिद्दीने सामना कला. 11 व्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या नसीम शाह सोबत मिळून संघाची धावसंख्या पुढे नेली. बाबरने चांगली फलंदाजी केली. पण नसीम शाहने सुद्धा हार मानली नाही. तिसऱ्या सेशनच्या सुरुवातीला आजमने शानदार शतक झळकावलं. बाबरच्या कसोटी करीयरमधील हे सातव शतक आहे. बाबरच बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. 244 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 119 धावा केल्या. त्याने पाकिस्तानची धावसंख्या श्रीलंकेच्या धावसंख्येच्या जवळ 222 पर्यंत पोहोचवली. पाकिस्तानने पहिल्या डावात 218 धावा केल्या. श्रीलंकेला निसटती 4 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्यादिवस अखेर श्रीलंकेच्या एक बाद 36 धावा झाल्या आहेत. श्रीलंकेकडे 40 धावांची आघाडी आहे. बाबर आझम आणि नसीम शाहने मिळून अखेरच्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. नसीम 2 तास खेळपट्टीवर होता. त्याने 52 चेंडूचा सामना करुन 5 धावा केल्या.