VIDEO: ऑस्ट्रेलियन फलंदाजाची वनडेमध्ये ट्रिपल सेंच्युरी, 49 Four, 1 SIX, संघाने ठोकल्या 541 धावा
क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच वेगवेगळे रेकॉर्ड बनतात आणि मोडले जातात. काही वेळा या रेकॉर्ड्सचं थोडं आश्चर्य वाटतं. आता ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने असा रेकॉर्ड केलाय, जो ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल.
मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच वेगवेगळे रेकॉर्ड बनतात आणि मोडले जातात. काही वेळा या रेकॉर्ड्सचं थोडं आश्चर्य वाटतं. आता ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने असा रेकॉर्ड केलाय, जो ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल. ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजाच नाव आहे, स्टेफान नीरो. त्याने वनडे क्रिकेटमध्ये थेट त्रिशतक ठोकलं. म्हणजे 40 षटकांच्या मॅचमध्ये 300 धावा. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? अहो, पण हे असं घडलय, वास्तवात. स्टेफान नीरोने (steffan nero) न्यूझीलंड विरुद्ध (AUS vs NZ) नाबाद 309 धावा फटकावल्या. स्टेफान नीरो वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा पहिला फलंदाज आहे. याआधी वनडेत ब्लाइंड क्रिकेट (Blind Cricket) सामन्यात अशी मोठी इनिंग खेळली गेली होती. पाकिस्तानच्या मसूद जानने 1998 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 262 धावा केल्या होत्या. पण आता स्टेफान नीरोने हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ब्लाइंड क्रिकेट सामन्यांची मालिका सुरु आहे.
किती चेंडू खेळला?
स्टेफान नीरोने 140 चेंडूत त्रिशतक झळकावलं. त्याने 49 चौकार आणि एक षटकार ठोकला. 40 ओव्हरच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 541 धावा केल्या. कुठल्याही टीमची वनडे क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. नीरो शिवाय मायकल जॅनिस (58) आणि ब्रियूर मायगाने 26 चेंडूत 50 धावा फटकावल्या. 542 धावांच्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने फक्त 272 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 269 धावांनी मोठा विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये आठ सामन्यांची मालिका
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंच्या संघांमध्ये आठ सामन्यांची मालिका सुरु आहे. आतापर्यंत 6 सामने झाले असून सर्व सामने ऑस्ट्रेलियानेच जिंकले आहेत. स्टेफान नीरो या सीजनमध्ये तीन इनिंग खेळला असून त्याने तीन शतकं झळकावली आहेत. नीरोने या आधी 146 चेंडूत 112 धावा फटकावल्या होत्या. त्याशिवाय 47 चेंडूत नाबाद 101 धावा सुद्धा केल्या आहेत.
A TRIPLE century! Steffan Nero finishes 309* (140) in the Australian Blind Cricket Team’s first ODI against New Zealand ??
That’s his third consecutive century at the #ICIS22 after scores of 113 (46) and 101* (47) earlier this week ? https://t.co/MDTiUnAC1S | #ASportForAll pic.twitter.com/cqv9vBEPW3
— Cricket Australia (@CricketAus) June 14, 2022
कसं खेळलं जातं ब्लाइंड क्रिकेट?
ब्लाइंड क्रिकेटमध्ये प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. तीन वर्गांमध्ये त्यांची विभागणी होते. 4 खेळाडू पूर्णपणे दृष्टीहीन असतात. 7 खेळाडू पूर्णपणे दृष्टीहीन नसतात. त्यांना थोडफार दिसतं. ब्लाइंड क्रिकेटमध्ये प्लास्टिक चेंडूचा वापर होतो. अंडर आर्म गोलंदाजी केली जाते. फलंदाज चेंडूचा आवाज ऐकून फटके खेळतो.