KL Rahul : के एल राहुल याच्या दुखापतीनंतर बुमराहचं नाव घेतं सुनील शेट्टी म्हणाला…
KL Rahul Injury : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू केएल राहुत दुखापतीमुळे केवळ आयपीएलमधूनच बाहेर नाही तर पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधूनही बाहेर झाला आहे. अशातच सुनील शेट्टीने जावई केएल राहुलबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला दुखापतीमुळे मोठा झटका बसला आहे. केएल राहुल आता आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधूनही बाहेर आहे. अशा परिस्थितीत ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. केएल राहुलचे सासरे म्हणजे सुनील शेट्टी पाहा काय म्हणालेत?
के. एल. राहुल याच्यावर सर्जरी होणार असून तो बरा होण्यासाठी सर्व चाहते प्रार्थना करत आहेत. आता अनेक खेळाडू जखमी असून त्यात बुमराह, अय्यर आणि राहुलचा समावेश झाला आहे. टीम इंडियामध्ये अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे मला वाटतं की राहुलच्या जागेवर डब्ल्यूटीसीमध्ये खेळण्याची नक्की कोणालाही संधी मिळेल. राहुल दुखापतीतून लवकरच बरा होऊन दमदार पुनरागमन करेल, असं सुनील शेट्टीने सांगितलं आहे.
1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात खेळताना फिल्डिंग करताना राहुलला दुखापत झाली होती. तो संपूर्ण सामन्यात बसून होता आणि शेवटला तो फलंदाजीसाठी आला होता. मात्र, 10 मिनिटे खेळपट्टीवर असूनही त्याला एकही धाव करता आली नाही. त्यासोबतच तो संघाला पराभवापासूनही वाचवू शकला नाही.
आयपीएल सामन्यादरम्यान केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. स्वत: केएल राहुलने ही पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे की तो आता आयपीएलमध्ये भाग घेणार नाही आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही तो बाहेर पडला आहे.
दरम्यान, राहुलला ज्या सामन्यामध्ये दुखापत झाली त्यामध्येच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण झालेलं पाहायला मिळालं होतं. राहुलच्या जागी लखनऊ संघाने आता कृणाल पंड्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.