IPL 2023 : SRH चा 13 कोटीचा प्लेयर असा बोल्ड झाला, तर कसं चालेलं? त्याच्या धावा आहेत 13,3,13,
IPL 2023 : असं सुरु राहिलं, तर सनरायजर्स हैदराबादची टीम कशी जिंकणार? अर्शदीपने त्याची कशी दांडी गुली केली, ते VIDEO मध्ये पहा. त्याला 13 धावा करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय.
SRH vs PBKS IPL 2023 : 13, 3, 13… या सनरायजर्स हैदराबादच्या खेळाडूच्या धावा आहेत. फ्रेंचायजीने त्याच्यावर 13.25 कोटी रुपये खर्च केलेत. ज्याच्यावर इतका पैसा खर्च केला, तो टीमच्या विजयात महत्वाच योगदान देईल, अशी अपेक्षा होती. पण मागच्या तीन सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 2023 मध्ये आपला पहिला विजय मिळवला. पण त्यांचा 13 कोटींचा खेळाडू या मॅचमध्ये अजिबात चालला नाही.
सनरायजर्स हैदराबादसाठी यंदाच्या सीजनची निराशाजनक सुरुवात झाली होती. आता त्यांना पहिला विजय मिळालय. निदान आता गाडी रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.
विश्वास दाखवला तसा खेळला नाही
सनरायजर्स हैदराबादचा 13.25 कोटी रुपयांचा जो खेळाडू फ्लॉप ठरतोय, त्याचं नाव आहे हॅरी ब्रूक. जितका विश्वास त्याच्यावर दाखवलाय, तशी कमाल अजून त्याला करता आलेली नाहीय. ब्रूकने पंजाब विरुद्ध फक्त 13 रन्स केल्या. अर्शदीपने सिंहने त्याला क्लीन बोल्ड केलं. याआधी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 4 चेंडूत 3 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध तो 13 रन्सवर बोल्ड झाला. हैदराबादची टीम 3 पैकी 2 मॅच आपल्या घरच्या मैदानावर खेळली. दोन्ही सामन्यात ब्रूकने 13 धावा केल्या. दोन्हीवेळा ब्रूक बोल्ड झाला.
Gendbaazi aisi jisse jhoom uthta hain #SaddaPunjab ??
Arshdeep Singh ? with another one of those swinging specials in #TATAIPL2023☝️#SRHvPBKS #IPLonJioCinema #IPL2023| @arshdeepsinghh @PunjabKingsIPL pic.twitter.com/uQDMmxYHAh
— JioCinema (@JioCinema) April 9, 2023
बेस प्राइस होती 1 कोटी 50 लाख
ब्रूकला हैदराबादने जास्त पैसे मोजून विकत घेतलं. त्याची बेस प्राइस 1 कोटी 50 लाख रुपये होती. पण लिलावात फ्रेंचायजीने 13.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलं. त्याच्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सुद्धा बोली लावली होती. पण यश हैदराबादला मिळालं. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याची बॅट शांत आहे. त्याच्यासाठी 13 धावा करणं सुद्धा कठीण बनलय. आयपीएलमध्ये दाखल होण्याआधी त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता. आयपीएल आधी बॅट तळपत होती
आयपीएलच्या आधी न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये ब्रूकने स्फोटक बॅटिंग केली होती. त्याने 2 टेस्ट मॅचमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतक झळकवली होती. पंजाब विरुद्ध हॅरी ब्रूकची बॅट चालली नाही. पण राहुल त्रिपाठी आणि कॅप्टन एडन मार्करमने मिळून विजय मिळवून दिला. त्रिपाठीने 48 चेंडूत नाबाद 74 धावा ठोकल्या. मार्करम 21 चेंडूत 37 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादने 8 विकेटने पहिला सामना जिंकला.