AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunrisers Hyderabad, IPL 2022: केन विलियमसनची Playing 11 तयार? जाणून घ्या SRH टीममधले दावेदार

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली सनरायझर्सचा संघ गेल्या मोसमातील अपयश मागे टाकून यावेळी आणखी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.

Sunrisers Hyderabad, IPL 2022: केन विलियमसनची Playing 11 तयार? जाणून घ्या SRH टीममधले दावेदार
Kane WilliamsonImage Credit source: Twitter/SRH
| Updated on: Mar 18, 2022 | 11:14 AM
Share

मुंबई : मागील हंगामातील विविध वादानंतर, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad- SRH) आयपीएलच्या (IPL 2022) नवीन हंगामात नव्या संघासह सज्ज आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली सनरायझर्सचा संघ गेल्या मोसमातील अपयश मागे टाकून यावेळी आणखी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. लिलावाव्यतिरिक्त, संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये ब्रायन लारा आणि डेल स्टेन सारख्या दिग्गजांचा समावेश केला आहे. पण मागच्या मोसमातील चुकांमधून संघाने धडा घेऊन संघातील अंतिम 11 जणांमध्ये उत्तम खेळाडूंची निवड केली आहे का? असा सवाल आहे. जर आपण लिलावाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या फ्रँचायझीने अनेक खेळाडूंवर बोली लावली, मात्र प्रत्येक वेळी यश मिळालं नाही. तरीही, संघाने निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर आणि एडन मार्कराम यांसारखे चांगले खेळाडू विकत घेतले, जे प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील.

कर्णधार केन व्यतिरिक्त, सनरायझर्सने अब्दुल समद आणि उमरान मलिकला संघात कायम ठेवले, तर भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन सारख्या खेळाडूंना पुन्हा खरेदी केले. मात्र, या लिलावानंतरही राशीद खानसारख्या दिग्गजाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी संघ योग्य पद्धतीने भरू शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असूनही, सनरायझर्स हैदराबादच्या 23 खेळाडूंच्या संघाकडे अधिक चांगली प्लेइंग इलेव्हन तयार करण्याचा पर्याय आहे.

संघाची मधली फळी मजबूत

सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी गेल्या मोसमापेक्षा खूपच चांगली दिसत आहे. विशेषत: मधल्या फळीत निकोलस पूरन, एडन मार्कराम आणि अब्दुल समदसारखे विध्वंसक फलंदाज आहेत. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी सांगितले होते की, अभिषेक शर्माला सलामीला संधी दिली जाईल, त्यामुळे राहुल त्रिपाठी त्याच्यासोबत सलामी करू शकतो. तसेच, सलामीसाठी आणि तिसऱ्या क्रमांकासाठी, राहुल त्रिपाठी आणि कर्णधार केन गरजेनुसार आपली जागा बदलू शकतात.

वॉशिंग्टन सुंदर संघाच्या आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत आहे. सुंदरला आतापर्यंत टी-20 मध्ये बॅटने फारसा प्रभाव दाखवता आलेला नाही, परंतु त्याच्याकडून अजूनही आशा आहे. त्यांच्याशिवाय मार्कराम, अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा हे देखील पार्ट टाईम फिरकी गोलंदाजी करू शकतात.

वेगवान गोलंदाजीमध्ये चांगले पर्याय

संघाकडे वेगवान गोलंदाजीमध्ये खूप चांगले पर्याय आहेत, ज्यामध्ये उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, कार्तिक त्यागी, मार्को यान्सन आणि रोमॅरियो शेफर्ड प्रमुख आहेत. यामध्ये उमरान आणि भुवनेश्वर खेळणार आहेत. नटराजन, यान्सन आणि कार्तिक यांच्यापैकी एकाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल, त्यात नटराजन तिसऱ्या जागेसाठी प्रबळ दावेदार आहे. रिस्ट स्पिनर म्हणून लेगस्पिनर श्रेयस गोपालला संधी मिळेल. त्याच्यासोबत सुंदर ऑलराऊंडर म्हणून संघात असेल.

SRH ची संभाव्य प्लेईंग 11

केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

इतर बातम्या

IPL 2022: राष्ट्रनिष्ठा की, IPL, अखेर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी दिलं उत्तर

IPL 2022: विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी प्रॅक्टिससाठी येणार ठाण्यात, एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

IPL 2022: पहिल्याच नेट सेशनमध्ये Mumbai Indians च्या टीम डेविडची दे, दणादण बॅटिंग, पहा VIDEO

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.