SA vs IND | तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या त्या निर्णयामुळे क्रिकेट चाहते हैराण

South africa vs india 3rd t20i | टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियसाठी हा तिसरा सामना करो या मरो असा आहे. या सामन्यात कॅप्टन सूर्याने घेतलेल्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

SA vs IND | तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या त्या निर्णयामुळे क्रिकेट चाहते हैराण
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 8:43 PM

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार एडन मारक्रम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. दक्षिण आफ्रिका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा तिसरा सामना करा या मरा असा आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी टीममध्ये 3 बदल केले आहेत. मात्र टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. सूर्याचा निर्णय काही क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही.

नक्की काय झालं?

मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला. दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयाचं खातं उघडलं. आता टीम इंडियाला मालिका गमावयाची नसेल तर हा सामना जिंकावा लागेल. मात्र सूर्याने या तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दुसऱ्या टी 20 सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल ही सलामी जोडी शून्यावर आऊट झाली. त्यानंतर रिंकू सिंह आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या जोडीने अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. मात्र पावसामुळे पहिला डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला डीएलएसनुसार विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 154 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केलं.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात खोऱ्याने धावा लुटवल्या. गोलंदाजांना 154 धावांचा बचाव करण्यात अपयश आलं. विशेष म्हणजे कॅप्टन सूर्याने नंबर 1 बॉल रवी बिश्नोई याला प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर ठेवलं. होतं. त्यामळे तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोई याला संधी दिली जाईल, असा ठाम विश्वास क्रिकेट चाहत्यांना होता. मात्र कॅप्टन सूर्याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास ठेवत टीममध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सूर्याच्या या निर्णयाबाबत विश्वास की धाडस अशी चर्चा रंगली आहे. आता सूर्याचा हा निर्णय चूक ठरतो की बरोबर हे थोड्याच वेळेत स्पष्ट होईल.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.