IND VS WI: सूर्यकुमारने मैदानावरच हात जोडून राहुल द्रविड यांना केला नमस्कार, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक

भारताच्या या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) 31 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि सात षटकार होते.

IND VS WI: सूर्यकुमारने मैदानावरच हात जोडून राहुल द्रविड यांना केला नमस्कार, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 2:06 PM

कोलकाता: भारताने काल वेस्ट इंडिज (India vs West indies) विरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या (T-20 Series) मालिकेत क्लीनस्वीप केलं. वनडे प्रमाणे भारताने टी-20 मालिकाही 3-0 ने खिशात घातली. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) 31 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि सात षटकार होते. सूर्यकुमारचा स्ट्राइक रेट 209 पेक्षा पण जास्त होता. सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर अक्षरक्ष: तुटून पडला. त्याने कठीण परिस्थितीत कमालीची फलंदाजी केली. वेंकटेश अय्यरसोबत मिळून सूर्यकुमारने अवघ्या 37 चेंडूत 91 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या सामन्यातच एक क्षण असा होता, जेव्हा धावफलकावर भारताच्या 15 षटकात फक्त 98 धावा होत्या. पण 20 षटकाअखेरीस भारताच्या पाच बाद 184 धावा झाल्या होत्या.

भारत बनला नंबर एक

वेंकटेश अय्यर आणि सूर्यकुमारने मिळून शेवटच्या पाच षटकात 86 धावा चोपल्या. या भागीदारीने वेस्ट इंडिजचा पराभव सुनिश्चित केला. त्याचवेळी मालिकाविजयासह भारत टी-20 फॉर्मेटमध्ये नंबर एक बनला. सामन्या दरम्यानचा सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार डगआऊटच्या दिशेने पाहून नमस्कार करताना दिसतो.

27 चेंडूत अर्धशतक

सूर्यकुमार यादवने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर त्याने टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला सलाम केला. हेड कोच राहुल द्रविड तर आपल्या जागेवरुन उठले व सूर्यकुमारसाठी ते टाळ्या वाजवत होते. त्यानंतर सूर्यकुमार हात जोडून नमस्कार करत, त्यांचं अभिवादन स्वीकारलं. या नमस्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एकवेळ अशीही होती जेव्हा दमदार फलंदाजी करुनही सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळत नव्हतं. अनेक माजी क्रिकेटपटू या प्रतिभावान फलंदाजाला संघात स्थान मिळत नसल्याने हैराण होते. सिलेक्टर्सनी संधी दिली नाही, तर टीम इंडियाचे दरवाजे तोड असंही हरभजन म्हणाला होता.

असा आहे सूर्यकुमारचा रेकॉर्ड

सूर्यकुमार यादवने संघात स्थान मिळताच स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याने सात वनडे सामन्यात 53.40 च्या सरासरीने 267 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये त्याने 12 डावात 39 च्या सरासरीने 351 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 165 पेक्षा जास्त आहे. मधल्याफळीत खेळताना सूर्यकुमारने चार अर्धशतक झळकावली आहेत.

suryakumar yadav namaste video to rahul dravid on ground during india vs west indies 3rd t20 match

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.