IND vs HK: एकदम कडक, सूर्यकुमारने जमिनीवर बसून मारला वेगळाच SIX, एकदा हा VIDEO बघा
IND vs HK: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत हाँगकाँग विरुद्धच्या (IND vs HK) सामन्यात आज सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खेळीने सर्वांना जिंकून घेतलं.
मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत हाँगकाँग विरुद्धच्या (IND vs HK) सामन्यात आज सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खेळीने सर्वांना जिंकून घेतलं. विराट कोहलीने भले अर्धशतक झळकावलं, पण सूर्यकुमारने आपल्या फटकेबाजीने सामन्याचा नूरच पालटला. सूर्यकुमारने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी करु शकला नव्हता. त्याने ती कसर आज हाँगकाँग विरुद्ध भरुन काढली. हाँगकाँगच्या गोलंदाजांवर सूर्यकुमार यादव आज अक्षरक्ष: तुटून पडला. त्याने चौफेर फटकेबाजी करताना, आपल्या भात्यातील काही खास फटके दाखवले. त्यामुळे भारताला हाँगकाँगसमोर विजयासाठी मोठं लक्ष्य ठेवता आलं. सूर्यकुमारने आज अवघ्या 26 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. यात 6 फोर आणि 6 सिक्स आहेत.
हा सिक्स कसा मारला?
सूर्यकुमारने आज सहा सिक्स मारले. पण त्याच्या एक सिक्सची भरपूर चर्चा आहे. क्रिकेट मध्ये स्कुपचा फटका खेळला जातो. सूर्यकुमारने स्कूप सिक्स दाखवला. हाँगकाँगचा एझाझ खान 16 वी ओव्हर टाकत होता. त्याने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर सूर्यकुमारने हा सिक्स मारला. सूर्यकुमारने ऑफसाइडला जाऊन खाली बसून विकेटकीपरच्या डोक्यावरुन सिक्स मारला.
SURYA ? pic.twitter.com/LGtsH6jmOk
— Harish Jangid (@HarishJ56732474) August 31, 2022
भारताने उभारलं मोठं लक्ष्य
निर्धारीत 20 ओव्हर्स मध्ये भारताचा 2 बाद 192 धावा झाल्या आहेत. भारताने हाँगकाँग समोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. सूर्यकुमार यादवच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर भारताला हे लक्ष्य उभारतला आलं. बऱ्याच काळापासून फॉर्मसाठी तरसणाऱ्या विराट कोहलीने दुबळया हाँगकाँग विरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्याने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या.