SA vs IND : ‘मी फक्त गेलो आणि…’; सूर्यकुमार यादवने सांगितली शतकामागची ईनसाईड स्टोरी!
Suryakumar Yadav Hundread : सूर्यकुमार यादव याचं शतक आणि कुलदीप यादव याच्या 5 विकेटच्या दमावर टीम इंडियाने 106 धावांनी तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना जिंकला. या सामन्यानंतर बोलताना सूर्याने शतकाआधी डोक्यात काय सुरू होतं ते सांगितलं आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. कॅप्टन शतकवीर सूर्यकुमार यादव याने शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. या विजयानंतर सूर्यकुमार यादव याने आपली प्रतिक्रिया देताना शतक करण्याआधी डोक्यात काय विचार केलेला याबाबत सांगितलं आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
आम्हाला निर्भिडपणे खेळायचं होतं, पहिल्यांदी बॅटींग करायची आणि आव्हानात्मक धावा करून त्या डिफेंड करायचा आमचा विचार होता. संघातील खेळाडू दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. तुम्हाला तुमचा खेळ समजून घेणं महत्त्वाचं आहे. मी फक्त मैदानामध्ये जातो आणि मनसोक्त आनंद घेतो, तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवा, असं सूर्यकुमार यादव याने सांगितलं.
सुर्यकुमार यादव या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापती झाला होता. त्याला दोन खेळाडूंनी उचलत मैदानाबाहेर नेलं होतं. त्यामुळे सूर्याला दुखापत तर नाही ना झाली? असा सवाल चाहत्यांना पडला होता. सामना संपल्यावर बोलताना, मी आता ठिक असून मला व्यवस्थित चालता येत असल्याचं सूर्यकुमार म्हणाला.
सामन्याचा धावता आढावा
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिका संघाला 201-7 धावा केल्या होत्या. यामध्ये ओपनर यशस्वी जयस्वालने 60 धावा आणि सूर्यकुमार यादवने 100 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून केशव महाराज आणि लिझाद विल्यम्स याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आफ्रिका संघाचा डाव 95 धावांवर आटोपला. कुलदीप यादवने सर्वाधिक 5 तर जडेजाने 2 विकेट घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.