Suryakumar Yadav IPL 2023 : हीच कमजोरी सूर्यकुमार यादववर पडू शकते भारी

Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्या खूप भारी खेळताय, पण एक कमजोरी सगळा खेळ बिघडवेल. सूर्या सारखा फलंदाज खूप खास आहे. तो बिनधास्त खेळतो. पण एक कमकुवत बाजू आहे. आकडेच ही गोष्ट सांगून जातात.

Suryakumar Yadav IPL 2023 : हीच कमजोरी सूर्यकुमार यादववर पडू शकते भारी
Suryakumar Yadav mi vs rcb ipl 2023
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 8:40 AM

मुंबई : पुढे, मागे, आडवे-तिरपे, कधी पॅडल स्वीप, तर कधी स्कूल फटके सूर्यकुमार यादव खूप सहजतेने मारतो. आपल्या खास बॅटिंग स्टाइलने तो मैदानावरील प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करतो. त्याच्या बॅटिग स्टाइलमुळेच त्याला मिस्टर 360 म्हणतात. सूर्या 22 यार्डच्या विकेटवर उतरतो, तेव्हा गोलंदाज त्याला थर-थर कापतात. आम्ही तुम्हाला म्हटलं सूर्यकुमार यादवची बॅटिंग करताना एक कमजोरी आहे, तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. आमच्यावर विश्वास नका ठेऊ, पण आकडे तुम्हाला सर्वकाही सांगून जातील.

सध्याच्या T20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव एक मोठा बॅट्समन आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. तो चौफेर फटकेबाजी करु शकतो. मैदानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये चेंडू पोहोचवण्याची त्याची क्षमता आहे. तो मैदानात असताना फोर-सिक्सचा पाऊस पाडतो.

एक काळजी घ्यावी लागेल

सूर्यकुमार यादवची बॅटिंग खूप खास आहे. आयपीएल 2023 मध्ये त्याला सूर गवसला आहे. RCB विरुद्धची मॅच त्याने सहज फिरवली. 35 बॉल्समध्ये त्याने 83 धावा फटकावल्या. योग्यवेळी सूर्यकुमार यादवला सूर गवसला आहे. पण सूर्यकुमारला बॅटिंग करताना एक काळजी घ्यावी लागेल. कारण नजर हटली, दुर्घटना घडली, असं सूर्याच्या बाबतीत होऊ शकतं. सूर्याच फ्लॉप होणं, मुंबई इंडियन्सची प्लेऑफची अडचण वाढवू शकतं.

सूर्यकुमार यादवची कमकुवत बाजू जाणून घ्या

समोर कुठलाही बॉलर असला, तरी सूर्या त्याची चिंता करत नाही. पण समोर लेफ्ट आर्म स्पिनर असेल, तर सूर्याचा आवेश थोडा थंडावतो, आणि तिच त्याच्या बॅटिंगमधील मोठी कमजोरी आहे. IPL मध्ये लेफ्ट आर्म स्पिनर विरोधात सूर्यकुमार 48 इनिंग खेळलाय. लेफ्ट आर्म स्पिनरचा सामना करताना त्याने 277 चेंडूंचा सामना केलाय. 107.58 च्या स्ट्राइक रेटने त्याने 298 धावा केल्यात. या दरम्यान लेफ्ट आर्म स्पिनरने त्याला 11 वेळा आऊट केलय. या स्ट्राइक रेटला कमजोरी नाही, तर अजून काय म्हणाल?

IPL 2023 मध्ये सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 186.13 चा आहे. T20 मध्ये 175.76 त्याचा स्ट्राइक रेट आहे. T20 मध्ये तो 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने तो धावा करतो. तेच, लेफ्ट आर्म स्पिनर विरोधात 107.58 स्ट्राइक रेटला कमजोरी नाही, तर अजून काय म्हणाल.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....