टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू

Salil Ankola Mother: भारतीय माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे.

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू
salil ankola motherImage Credit source: salil ankola instagram
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 8:44 PM

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता सलील अंकोला यांच्या आई माला अंकोला यांचा मृत्यू झाला आहे. माला अंकोला या 77 वर्षांच्या होत्या. माला अंकोला यांचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या राहत्या घरात आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माला अंकोला यांच्या मानेवर जखमेच्या खुणा आहेत. त्यामुळे माला अंकोला यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की की त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. आता पुणे पोलिसांकडून या प्रकरणत सखोल चौकशी केली जात आहे.

सलील अंकोलाची सोशल मीडिया पोस्ट काय?

View this post on Instagram

A post shared by Salil Ankola (@salilankola)

सलील अंकोला यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत त्यांच्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली आहे.”गुड बाय मॉम”, असं सलील अंकोल याने या पोस्टमध्ये म्हटलंय. माला यांच्या निधनाने अंकोला कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सलील अंकोलाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सलील अंकोला याने टीम इंडियाचं एकूण 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. सलीलने एकाच वर्षात कसोटी आणि एकदिवसीय पदार्पण केलं. सलीलने 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र सलीलचा हाच पहिला सामना अखेरचा ठरला. सलीलने या एकमेव कसोटीत 6 धावा केल्या.

तर त्यानंतर 18 डिसेंबर 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध वनडे डेब्यू केलं. सलीलने कारकीर्दीत 20 एकदिवसीय सामन्यांमधील 13 डावात 34 धावा केल्या. तसेच सलीलने टेस्टमध्ये 2 आणि वनडेमध्ये 13 असे एकूण 15 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. सलील अंकोला 1996 चा वर्ल्ड कपही खेळला होता. मात्र सलीलला 1997मध्ये ट्युमरमुळे निवृत्ती घ्यावी लागली.

सलीलने क्रिकेटमधील निवृत्तीनंतर काही काळानंतर अभिनयाकडे मोर्चा वळवला. सलीलने बॉलिवडूमध्ये पदार्पण केलं. सलीलने 2000 साली संजय दत्त याच्यासह कुरुक्षेत्र या सिनेमात पोलीस उपनिरीक्षकाची भूमिका बजावली होती. तसेच सलीलने ‘चुरा लिया है तुमने’, एकता और द पावर, रिवायत आणि यासारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडली. तसेच सलील अंकोला यांनी नुकतंच बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिली होता.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.