T20 Blast : लास्ट बॉलवर ड्रामा, त्याने बाऊंड्रीवर जबरदस्त कॅच घेऊन चेंडू हवेत फेकला, पण…VIDEO
T20 Blast : क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. T20 मुळे क्रिकेटची रंगत आणखी वाढली आहे. काल Ashes सीरीजचा दुसऱ्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. त्याचवेळी तिथून जवळच T20 Blast टुर्नामेंटध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
लंडन : इंग्लंडमध्ये रविवारी संध्याकाळी रोमांचक क्रिकेट सामना पाहायला मिळाला. सर्वांच लक्ष लॉर्ड्स टेस्टवर होतं. तिथे शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु होता. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने स्फोटक शतकी खेळी करुन टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लॉर्ड्सपासून 7 किमी अंतरावर ओव्हल मैदानात T20 ब्लास्ट टुर्नामेंट सुरु होती. तिथे शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला. तिथे कॅच घेण्याच्या प्रयत्नात फिल्डरने चेंडू बाऊंड्री लाइनच्या बाहेर फेकला.
रविवारी 2 जुलैच्या संध्याकाळी लंडनच्या एका भागात टेस्ट क्रिकेटमध्ये जोरदार सामना सुरु होता. दुसऱ्याबाजूला ओव्हलच्या मैदानात टी 20 क्रिकेटची धमाल सुरु होती. लोकल क्लब सरे आणि एसेक्समध्ये ग्रुप स्टेजचा सामना झाला. या मॅचमध्ये 400 धावा झाल्या. निकाल शेवटच्या चेंडूवर लागला.
शेवटच्या चेंडूवर थरार
एसेक्सच्या फिरोज खुशीने 26 चेंडूत नाबाद 35 धावा करुन सामना संपवला. लास्ट बॉलवर जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर एसेक्सला विजयासाठी 3 धावांची गरज होती. स्ट्राइकवर फिरोज होता. शॉन एबोट गोलंदाजी करत होता. एबॉटच्या चेंडूवर फिरोजने डिप मिडविकेटला जोरदार शॉट मारला.
WHAT A FINISH ?
Feroze Khushi’s big hit is caught brilliantly on the boundary, but can’t be kept in the field, and Essex win!#Blast23 pic.twitter.com/03ifEb7dSL
— Vitality Blast (@VitalityBlast) July 2, 2023
मागे पळत जाऊन कॅच पकडली, पण….
सरेचा फिल्डर ख्रिस जॉर्डनने मागे पळत जाऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. जॉर्डनने कॅच पकडली होती. पण बाऊंड्रीवर त्याचं संतुलन बिघडलं. चेंडू पुन्हा मैदानात फेकण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून चूक झाली. त्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकला. त्यामुळे एसेक्सला 6 रन्स मिळाले व त्यांनी सामना जिंकला.