AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND A vs AFG A Semi Final Live Streaming : टीम इंडियाचं ‘मिशन सेमी फायनल’, उपांत्य फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार

India A vs Afghanistan A Semi Final Live Streaming : टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात उपांत्य फेरीतील सामना आज 25 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

IND A vs AFG A Semi Final Live Streaming : टीम इंडियाचं 'मिशन सेमी फायनल', उपांत्य फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार
india a huddle Talk Tilak VarmaImage Credit source: tilak varma x account
| Updated on: Oct 25, 2024 | 3:18 PM
Share

एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. साखळी फेरीचा थरार संपला असून आता उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे. एकूण 10 संघांपैकी टीम इंडिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंकाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आज 25 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर थोड्याच वेळात टीम इंडिया-अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाच्या या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना केव्हा?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना शुक्रवारी 25 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए यांच्यातील सामना हा अमेरात येथील अल अमेरात क्रिकेट ग्राउंड, मिनिस्ट्री टर्फ येथे खेळवण्यात येणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मॅच मोबाईलवर हॉटस्टार एपवर पाहता येईल.

इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग, अनुज रावत, हृतिक शोकीन, आर साई किशोर, राहुल चहर, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिक दार सलाम, अंशुल कंबोज, आकीब खान, वैभव अरोरा आणि निशांत सिंधू

अफगाणिस्तान ए टीम : दरविश रसूली (कॅप्टन), सेदीकुल्लाह अटल, वफीउल्लाह तारखिल, नुमान शाह (विकेटकीपर), शाहिदुल्ला कमाल, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, नांगेलिया खरोटे, अब्दुल रहमान, कैस अहमद, फरीदून दाऊदझाई, झुबैद अकबरी, अल्ला गझनफर, बिलाल सामी आणि मोहम्मद इशाक.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.