T20 Women World Cup Final : चोकर्सचा शिक्का आफ्रिकेचा महिला संघ पुसणार, SA च्या क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक दिवस
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेचा संघ वर्ल्ड कप उंचावण्यापासून एक विजय दूर आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा क्षण ऐतिहासिक दिवसापेक्षा काही कमी नाही.
केपटाऊन : टी-20 महिला वर्ल्ड कपमधील अंतिम दोन संघ आता 26 तारखेला फायनलमध्ये भिडणार आहेत. सेमी फायनलमध्ये दोन्ही संघांनी काटे की टक्कर देत विजय मिळवला होता. फायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाने एकदा दोनदा नाहीतर सातवेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पुरूष संघाला आयसीसीच्या कोणत्याही वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा क्षण ऐतिहासिक दिवसापेक्षा काही कमी नाही.
एकेकाळी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये तोडीस तोड खेळाडू होते. मिस्टर360 ए बी डेव्हिलियर्स, हाशिम आमला, ड्यू प्लेसिस, डेव्हिड मिलर, मोर्केल, डेल स्टेन हे खेळाडू असतानाही आफ्रिकेचा संघ एकदाही फायनल जिंकणं सोडाच फायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही. मात्र महिला संघाने यंदा करून दाखवलं आहे. त्यामुळे चौकर्स म्हणून आफ्रिकेच्या संघाला हिणवलं जातं, मात्र हा डाग पुसण्याचं काम दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने केलं आहे. जर फायनल जिंकली तर चोकर्सचा संघ चॅम्पियन होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेचा संघ वर्ल्ड कप उंचावण्यापासून एक विजय दूर आहे. मात्र त्यांच्यासाठी हे आव्हान काही सोपं नसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा असून गेलेला सामना आपल्याकडे त्यांनी कित्येकवेळा फिरवला आहे.
साखळी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढत झाली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 124 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमवून 16 षटकं आणि 3 चेंडूत पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी आमि 21 चेंडू राखून पराभव केला होता.
टी20 वर्ल्डकपमध्ये ‘या’ संघांनी जेतेपदावर कोरलं नाव
- 2009 इंग्लंड (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड), इंग्लंडने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
- 2010 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलँड) ऑस्ट्रेलियाने 3 धावांनी हा सामना जिंकला.
- 2012 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी हा सामना जिंकला.
- 2014 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हा सामना जिंकला.
- 2016 वेस्ट इंडिज (ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज) वेस्ट इंडिजने 8 गडी राखून सामना जिंकला.
- 2018 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड) ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला.
- 2020 ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत) ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी हा सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकन संघ- अन्नेरी डेर्कसन, लारा गुडाल, लॉरा व्होलवार्ट, अन्नेके बॉच, च्लोई ट्रायोन, डेलमारी टकर, मॅरिजेन कॅप्प, नदीन डि क्लर्क, सुने लूस (कर्णधार), सिनालो जाफ्ता, टाझमिन ब्रिट्स, अयाबोंगा खाका, मासबाटा क्लास, नोन्कुलुलेको म्लाबा, शबनिम इस्माईल