IND Vs SA Final: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ICC ची फायनलआधी मोठी घोषणा!

IND vs SA Final: टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी 29 जून रोजी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप फायनल सामना बारबाडोस येथे होणार आहे.

IND Vs SA Final: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ICC ची फायनलआधी मोठी घोषणा!
india vs south africa hardik pandya aiden markram
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 10:39 PM

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा फायनलमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी सामना होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. टीम इंडियाची ही वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची तिसरी तर दक्षिण आफ्रिकेची पहिली वेळ ठरली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचं काहीस टेन्शन वाढलं आहे. आयसीसीने केलेल्या घोषणेमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. जाणून घेऊयात नक्की काय झालंय.

आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरीसाठी पंचांची नावं जाहीर केली आहेत. रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कप फायनलमध्ये ख्रिस गॅफनी आणि रिचर्ड इलिंगवर्थ फिल्ड अंपायर असणार आहेत. तर रिचर्च कॅटलबरो टीव्ही अंपायर असणारआहे. तर रॉडनी टकर फोर्थ अंपायरची भूमिका बजावणार आहेत. अंपायर रिचर्ड कॅटलबरो याने बाद फेरीत घेतलेले काही निर्णय हे टीम इंडिया विरुद्ध गेले आहेत. त्यामुळे कॅटलबरो वर्ल्ड कप फायनलमध्ये अंपायर असल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिली आहे.

रिचर्ड टीम इंडियाच्या 6 नॉक आऊट सामन्यात पंच राहिले आहेत. टीम इंडियाला या सर्व सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. टी 20 वर्ल्ड कप 2014 फायनल, वर्ल्ड कप सेमी फायनल 2015, 2016 सेमी फायनल, चॅम्पियन ट्रॉफी 2017 फायनल, 2019 आणि वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये रिचर्ड अंपायर होता.टीम इंडियाला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं.

वर्ल्ड कप 2024 फायनलमधील पंच

दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.