T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ठेवलं 128 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 9 गडी गमवून 128 धावा केल्या आणि विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं.

T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ठेवलं 128 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 9:31 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत सुरू आहे. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय वेस्ट इंडिजच्या मनासारखा झाला. असं नाणेफेकीनंतर झालेल्या निर्णयानंतर कर्णधार मॅथ्यूने सांगितलं. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 128 धावा केल्या आणि विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर या जोडीने सावध खेळी केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 48 धावांची भागीदारी केली. सुझी बेट्सने 28 चेंडूत 1 चौकार मारत 26 धावा केल्या आणि बाद झाली. तर अमेलिया केर काही खास करू शकली नाही फक्त 7 धााव करून तंबूत परतली.

असं असताना जॉर्जिया प्लिमरच्या रुपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. तिने 31 चेंडूत 33 धावा केल्या. यात 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. 12 चेंडूत 1 चौकार मारत 12 धावा करून बाद झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली ब्रूक हालिडेने 9 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. मॅडी ग्रीन 3, इसाबेल्ला गेझ, रोझमॅरी मेयर 2, ली ताहूहू 6 तर इडेन कारसन 0 धावा करून तंबूत परतली. वेस्ट इंडिजकडून डिएन्ड्रा डॉटीनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर एफी फ्लेचरने 2 आणि करिष्मा रामहारक, अलिया एलेयनने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यापैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता लागून आहे. न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली तर यंदा क्रीडाविश्वाला नवा जगतजेता मिळेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

वेस्ट इंडिज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, स्टॅफनी टेलर, चिनेल हेन्री, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, आलिया ॲलेने, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.