AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

T20 World Cup: विश्वचषकातील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर आज भारत आपला तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. आझ भारताची लढत अफगाणिस्तानशी असणार आहे.

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 10:17 AM

T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघासाठी (India Cricket team) अत्यंत खराब सुरु असलेल्या यंदाच्या टी -20 विश्वचषका (T20 World Cuo 2021) संघाला अद्यापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने  10 विकेट्सनी आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतीय संघाच्या पुढील फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

तरीही आशेवर दुनिया कायम आहे असं म्हणतात ना…तसंच उर्वरीत सामन्यात मोठ्या फरकाने विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. यातील पहिला सामना आज अफगाणिस्तान संघाविरुद्ध (india vs afghanistan) खेळवला जाणार आहे. स्पर्धतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला विजय अनिवार्य असून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानलाही विजय महत्त्वाचा आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी – 20 विश्वचषकाचा सामना कधी खेळवला जाईल?

टी – 20 विश्वचषकातील टीम इंडियाचा तिसरा सामना आज बुधवारी (3 नोव्हेंबर) अफगाणिस्तान विरुद्ध सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आजचा टी -20 सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर खेळवला जाईल.

भारत आणि अफगाणिस्तान  यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?

टीम इंडियाचा टी 20 विश्वचषकातील आजचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग कोठे होईल?

या सामन्यांचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता

संभाव्य भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी.

संभाव्य अफगाणिस्तान संघ: हजरतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनउल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जदरान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नाईब, राशिद खान, करीम जनत, हामिद हसन, नवीन उल् हक, मुजीब उर् रहमान

इतर बातम्या

T20 World Cup 2021: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘राशिद’ नावाचा खतरा, दिग्गज भारतीय खेळाडूंनाही फुटतो घाम

विराटच्या मुलीला धमकावणारा होणार गजाआड, दिल्ली पोलिसांनी कसली कंबर

India vs New zealand 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित नव्हे दुसऱ्याच खेळाडूकडे संघाची धुरा?

(T20 world cup india vs new Afghanistan live streaming when and where to watch online match)

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.