IND vs SA 2nd Test | दुष्काळात तेरावा महिना! दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी
SA vs IND 2nd Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विजयाच्या शोधात असताना एक वाईट बातमी समोर आली आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीला होणार आहे. हा सामना केप टाऊन येथे पार पडणार असून टीम इंडियासाठी करो या मरो असा असणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला होता. या पराभवाचा बदला घेत टीम इंडिया नवीन वर्षाची विजयाने सुरूवात करण्यासाठी सज्ज आहे. मात्र दुसऱ्या कसोटीआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
टीम इंडिया विजयासाठी उत्सुक आहे, वर्ल्ड कप फायनल गमावल्यावर सीनिअर खेळाडूंनी खेळलेल्या पहिल्याच सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यासाठी जखमी वाघ जिंकण्याच्या तयारीत असताना स्टार ऑल राऊंडर शार्दुल ठाकूरला नेटमध्ये फलंदाजी करताना खांद्याला दुखापत झाली आहे. खांद्याला बॉल लागला त्यानंतरही ठाकूर याने फलंदाजी सुरू ठेवली.
शार्दुल ठाकूर थ्रोडाऊनमधून चेंडूंचा सराव करत होता, विक्रम राठोड यांनी फेकलेला चेंडू त्याच्या खांंद्याला लागला. सराव सत्र सुरू झाल्यावर अवघ्या 15 मिनिटांमध्येच त्याला दुखापत झाली. पहिल्या कसोटीमध्ये संघाचा भाग असलेला शार्दुल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान