Hardik Pandya: पंड्याचं बडोद्यात ‘हार्दिक’ स्वागत, वर्ल्ड कप हिरोला पाहण्यासाठी तोबा गर्दी, व्हीडिओ पाहाच

Hardik Pandya Grand Welcome Vadodara: टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने टी 20 वर्ल्ड कप विजयात निर्णायक भूमिका बजावली. पंड्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर पहिल्यांदाच बडोद्यात पोहचला. त्यानंतर हार्दिकचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

Hardik Pandya: पंड्याचं बडोद्यात 'हार्दिक' स्वागत, वर्ल्ड कप हिरोला पाहण्यासाठी तोबा गर्दी, व्हीडिओ पाहाच
hardik pandya grand welcome badoda
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 7:15 PM

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 17 वर्षांनी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने या वर्ल्ड कप स्पर्धेतील खेळलेले सर्व सामने जिंकले. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयात ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने बॅटिंग, बॉलिंगसह फिल्डिंगमधूनही योगदान दिलं. हार्दिकने वर्ल्ड कप फायनलमधील निर्णायक ओव्हर टाकून टीम इंडियाचा विजय निश्चित केला.

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतात खेळाडूचं जंगी स्वागत करण्यात आलं. खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर वर्ल्ड कप विजयी संघांची मुंबईत नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी मिरवणुकीसाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्हवर एकच गर्दी केली होती. या जल्लोषानंतर खेळाडू आपआपल्या घरी पोहचले.

त्यानंतर आता टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या अनेक दिवसांनी आपल्या घरी अर्थात बडोद्यात (वडोदरा) पोहचला. हार्दिकचं मुंबईप्रमाणे बडोद्यातही जंगी स्वागत करण्यात आलं आहे. हार्दिकची बडोद्यातही ओपन डेकबसमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. हार्दिकसोबत ओपन डेक बसमध्ये त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि टीम इंडियाचा क्रिकेटर कृणाल पंड्या हा देखील पाहायला मिळत आहे.

‘हार्दिक’ स्वागत

हार्दिकने आपल्या घरच्यांकडून मनापासून स्वागताचा स्वीकार केलाय. तसेच त्यांचे आभार मानले आहेत. हार्दिक या विजयी मिरवणुकीत टीम इंडियाच्या जर्सीत दिसून आला. हार्दिकने यावेळेस बसमधून त्याच्या चाहत्यांना हात दाखवला आणि त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. हार्दिकच्या मिरवणुकीसाठीच्या ओपन डेक बसला सजावट करण्यात आली आहे. “हार्दिक पंड्या प्राईड ऑफ वडोदरा”, असा मसेज असलेला स्टीकर हा बसवर पाहायला मिळत आहे. हार्दिकच्या स्वागताचे अनेक व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडयावर व्हायरल होत आहेत.

मुंबईकर खेळाडूंचा खास सन्मान

दरम्यान काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कप विजयी संघांतील 4 मुंबईकर खेळाडूंचं विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये स्वागत करण्यात आलं होतं. कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. यावेळेस या खेळाडूंनी आपलं मनोगतही व्यक्त केलं होतं.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.