England Tour India | ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता इंग्लंडला लोळवण्यासाठी भारताचा तगडा संघ सज्ज
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच संपला आहे. कांगारुंविरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने गमावली तर टी-20 आणि कसोटी मालिका टीम इंडियाने खिशात घातल्या. आता टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या इंग्लंडच्या भारत दौऱ्याची आधीच घोषणा करण्यात आली आहे. तसेच आता भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपासून उभय संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. (Team India announced sqaud against england for first 2 test Matches)
इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नई तर उर्वरित 2 सामने हे अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा डे नाईट असणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पॅटर्निटी लिव्ह संपली असून तो संघात पुनरागमन करणार आहे.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च
India have announced the squad for the first two Tests against England
Captain Virat Kohli, Ishant Sharma, and Hardik Pandya are back in the side https://t.co/vUCGQkIK2e #INDvENG pic.twitter.com/rj0OnRJACF
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 19, 2021
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीची टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल
उभय संघांमधील टी-20 मालिका
पहिला सामना – 12 मार्च दुसरा सामना – 14 मार्च तिसरा सामना – 16 मार्च चौथा सामना – 18 मार्च पाचवा सामना – 20 मार्च
एकदिवसीय मालिका
पहिली मॅच – 23 मार्च दूसरी मॅच – 26 मार्च तिसरा मॅच – 28 मार्च
अहमदाबादमध्ये टी 20 तर पुण्यात वनडे सीरिज
कसोटी मालिकेनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे. विशेष म्हणजे हे पाचही सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमध्ये खेळण्यात येणार आहे. मोटेरा स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. या टी 20 मालिकेनंतर सर्वात शेवटी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होईल. हे तिनही सामने पुण्यात (Pune) खेळले जाणार आहेत.
संबंधित बातम्या:
Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला
Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….
(Team India announced sqaud against england for first 2 test Matches)