Team India : वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाच्या बॉलर्सला आयसीसीचा 440 व्होल्टचा झटका, चाहतेसुद्धा नाराज

वर्ल्ड कपमध्ये आपली सर्व ताकद लावत टीम इंडियाच्या बॉलर्सने प्रत्येक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड कप झाल्यावर आयसीसीने अशी वाईट बातमी दिली आहे की सर्वांनाच झटका बसल्याशिवाय राहणार नाही. योगायोग म्हणा किंवा दुसरं काही पण चाहतेही नाराज झालेत.

Team India : वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाच्या बॉलर्सला आयसीसीचा 440 व्होल्टचा झटका, चाहतेसुद्धा नाराज
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:26 PM

टीम इंंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. फायनलमधील विजयासह भारताने 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. गोलंदाजांनी अनेक सामने टीम इंडियाला जिंकवून दिले. याच गोलंदाजांच्या जीवावर टीम इंडियाने वर्ल्ड कपवर आपल्या नावावर केला. मात्र आयसीसीने आता जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाला झटका बसला आहे.

टीम इंडियासाठी कायम निधड्या छातीने विरोधी संघावर तुटून पडणारा जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. फायनल सामन्यातही त्याने टाकलेल्या ओव्हर टर्निंग पॉईंट ठरल्या. वर्ल्ड कप झाल्यावर बुमराहला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ने गौरवण्यात आलं होतं. बुमराहने या वर्ल्ड कपमध्ये 14 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. मात्र रँकिंगमध्ये तो 14 व्या स्थानी फेकला गेला असून दोन स्थानांचा त्याला फटका बसला आहे. अर्शदीप सिंग 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक 15 विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तोही 19व्या क्रमांकावर असून पाच स्थानांनी फेकला गेला आहे. त्याचे 622 रेटिंग गुण आहेत.

अक्षर पटेलची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो सध्या 9व्या क्रमांकावर आहे. त्याचे 644 रेटिंग गुण आहेत. तर T20 विश्वचषकात त्याने 9 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पंड्याने वर्ल्ड कपमध्ये10 विकेट घेतल्या.फायनलमध्ये त्याने शेवटची ओव्हर टाकली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र तोसुद्धा 4 स्थानांनी घसरून 57 व्या स्थानावर आला आहे. त्याचे 475 रेटिंग गुण आहेत.

कुलदीप यादव याला सुपर -८ फेरीमध्ये गेल्यावर टीममध्ये स्थान मिळालं. कुलदीपने 10 विकेट्स घेतल्या आणि प्रत्येक सामन्यात आपली छाप उमटवली. रँकिंगमध्ये त्याला 3 स्थानांचा तोटा झाला असून 11 व्या क्रमांकावर गेला आहे. मोहम्मद सिराज यालाही रँकिंगमध्ये तो नुकसान झालं आहे. पहिल्या फेरीममध्ये टीममध्ये असलेल्या सिराज याला 73 व्या क्रमांकावर असून त्याचे 435 रेटिंग गुण आहेत.  तर रवींद्र जडेजासाठी  वर्ल्ड कप काही खास राहिल नाही. जडेजाही 90व्या क्रमांकावर फेकला गेला असून त्याला चार स्थानांच नुकसान झालं आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.