Jasprit Bumrah : यॉर्कर किंग झाला ‘बाप’माणूस, चिमुकल्याचं ठेवलं हे खास नाव

Jaspreet Bumrah Father : जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून तो का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे.

Jasprit Bumrah : यॉर्कर किंग झाला 'बाप'माणूस, चिमुकल्याचं ठेवलं हे खास नाव
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 11:55 AM

मुंबई : आशिया कप 2023 मधील नेपाळचा सामना टीम इंडियाचा स्टार बॉलर सोडून जसप्रीत बुमराह मायदेशी का परतला याचं कारण अखेर समोर आलं आहे. (Sanjana Ganeshan have a Baby Boy) जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बुमराहने आपल्या घरी आलेल्या पाहुण्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दोघांनाही आपल्या बाळाचं नावसुद्धा ठरवलं आहे.

आशिया कप 2023 मध्ये आज टीम इंडियाचा सामना नेपाळसोबत होणार आहे. हा सामना सोडून बुमराह माघारी परतल्याने सर्वांना धक्का बसला होता. असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे त्याला एकाएकी माघारी यावं लागलं. कोणालाची काही कल्पना नव्हती. आज खरं कारण समोर आलं, संजना आणि बुमराह दोघे आई-बाबा झालेत.

जसप्रीत बुमराह पोस्ट करत पाहा काय म्हणाला?

आमचं छोटंसं कुटुंब आता वाढलंय आणि आमचं हृदय प्रेमाने अधिक भरलंय. आज सकाळी आमच्या आयुष्यात चिमुकला पाहुणा, अंगद जसप्रीत बुमराहचं आगमन झालं. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आयुष्यातील या नव्या टप्प्यासोबत येणाऱ्या अनेक आनंददायी गोष्टींसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, असं जसप्रीत बुमराहने ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराह फक्त नेपाळविरूद्धचा सामना खेळनार नाही. सुपर 4 मधील सामन्यांसाठी तो परत माघारी येणार आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिया कप महत्त्वाचा असून संघात त्याने लवकरात लवकर परतावं अशी चाहत्यांची इच्छा होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.